करोना विषाणूचा सामना करण्यासाठी मार्च महिन्यापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट पूर्णपणे बंद करण्यात आलेलं आहे. बीसीसीायनेही आयपीएलचा तेरावा हंगाम पुढील सूचना मिळेपर्यंत स्थगित केला आहे. मात्र स्पर्धा रद्द होत असल्यामुळे होणार आर्थिक नुकसान भरुन काढण्यासाठी आयसीसीने प्रयत्न सुरु केले आहेत. या प्रयत्नांना आता हळुहळु यश येताना दिसत आहे, इंग्लंड क्रिकेट बोर्डाने जुलै महिन्यात वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी मालिकेचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. ८ जुलैपासून या मालिकेला सुरुवात होणार असून हे सर्व कसोटी सामने प्रेक्षकांविना खेळवले जाणार आहेत.
वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाने या मालिकेसाठी आपला १५ जणांचा संघ जाहीर केला आहे. Daily Mail ने दिलेल्या माहितीनुसार, डॅरेन ब्राव्हो, शिमरॉन हेटमायर आणि किमो पॉल या ३ खेळाडूंनी करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचं कारण देत न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. सध्याच्या खडतर काळात बोर्ड कोणत्याही खेळाडूला जबरदस्ती करणार नाही असं विंडीज बोर्डाने स्पष्ट केलं होतं.
असा असेल वेस्ट इंडिजचा संघ –
जेसन होल्डर, क्रेग ब्रेथवेट, शाई होप, शेन डॉरिच, रोस्टन चेस, शेमार ब्रूक्स, रहकीम कॉर्नवॉल, एन्कुरमा बोनेर, अल्झारी जोसेफ, चेमार होल्डर, जॉन कँपबेल, रेमॉन रेफर, केमार रोच, जेर्मिन ब्लॅकवूड, शेनॉन गॅब्रिअल
असं असेल इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील कसोटी मालिकेचं वेळापत्रक –
- ८ ते १२ जुलै – पहिली कसोटी (Ageas Bowl)
- १६ ते २० जुलै – दुसरी कसोटी (Old Trafford)
- २४ ते २८ जुलै – तिसरी कसोटी (Old Trafford)
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 3, 2020 6:04 pm