28 November 2020

News Flash

Video : रैनाची माघार CSK ला महागात पडणार ??

CSK संघ व्यवस्थापनही रैनावर नाराज

चेन्नई सुपरकिंग्जचा अष्टपैलू खेळाडू सुरेश रैनाने आयपीएलमधून माघार घेतली आहे. खासगी कारण देऊन २९ ऑगस्ट रोजी रैना भारतात परतला. आयपीएलच्या हंगामासाठी महिनाभर आधी तयारी करणारा, चेन्नईत ट्रेनिंग कँपमध्ये सहभागी होणाऱ्या रैनाने अचानक माघार घेतल्यामुळे सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केलं होतं. आता रैनाने माघार घेतल्याची अनेक कारणं समोर येत आहेत. संघात दोन खेळाडूंना झालेली करोनाची लागण, हॉटेलमध्ये मनासारखी रुम न मिळणं अशी अनेक कारणं रैनाने माघार घेण्यामागे सांगितली जात आहेत. CSK चं संघ प्रशासनही रैनावर नाराज असल्याचं समजतं आहे.

परंतू या पलिकडे जाऊन सुरेश रैनाचं CSK च्या संघासाठीचं महत्व कोणीही नाकारु शकणार नाही. धोनीच्या संघाचा सुरेश रैना हा एकाप्रकारे आधारस्तंभ होता. फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण अशी तिहेरी भूमिका रैना साकारायचा. त्याच्या अनुपस्थितीचा चेन्नई संघाला फटका बसेल का?? या प्रश्नाचा घेतलेला आढावा…

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 31, 2020 5:14 pm

Web Title: will suresh rainas absence hurt csk in ipl 2020 psd 91
टॅग IPL 2020
Next Stories
1 शोएब अख्तर पाकिस्तानच्या संघावर भडकला, म्हणाला…
2 IPL 2020 : सलामीच्या सामन्यातून CSK बाद?? मुंबईला विराटच्या RCB चं आव्हान मिळण्याचे संकेत
3 IPL : रैनासाठी चेन्नईची दारं बंद?? CSK संघ व्यवस्थापन नाराज
Just Now!
X