विम्बल्डन ग्रँडस्लॅमच्या उपांत्य फेरीचा दुसरा सामना नोवाक जोकोविच आणि राफेल नदाल यांच्यामध्ये सुरु असून यामध्ये तीन सेट पूर्ण झाले असून जोकोविच ६-४, ३-६, ७-६ च्या सेटने आघाडीवर आहे. कर्फ्यु टाइममुळे हा सामना शनिवारी पहाटे ३.३० वाजता थांबवण्यात आला. तो शनिवारी संध्याकाळी ५.३० वाजता पुन्हा पुढे सुरु होईल. या सामान्यांतील विजेता अंतिम फेरीत केविन अँडरसनशी भिडणार आहे.

केविन अँडरसन आणि जॉन इस्नर यांच्यामध्ये पुरुष उपांत्य फेरीचा पहिला सामना शुक्रवारी संध्याकाळी ५.३० मिनिटांनी सुरु झाला. विम्बल्डनच्या इतिहासातील दुसऱ्या क्रमांकावरील सर्वाधिक वेळ गाठताना हा सामना तब्बल साडे सहा तास चालला. शुक्रवारी रात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास तो संपला. तर नोवाक जोकोविच आणि राफेल नदाल यांच्यातील दुसऱ्या समान्याला रात्री ११ वाजता सुरुवात झाली. कर्फ्यु टाइममुळे हा सामना शनिवारी पहाटे ३.३० वाजता थांबवण्यात आला.

दरम्यान, जोकोविच आणि नदाल यांच्यामध्ये रंगलेल्या दुसऱ्या समान्यात एकून तीन सेट झाले यामध्ये जोकोविच दोन सेट खेळला तर एक सेट नदाल. यामध्ये जोकोविच आघाडीवर असून सामना थांबवला त्यावेळी या सामन्याचा स्कोर ६-४, ३-६, ७-६ झाला होता. त्यानंतर आता शनिवारी संध्याकाळी ५.३० वाजता उर्वरित खेळ पुन्हा सुरु होणार आहे. त्यानंतर होणाऱ्या दोन सेटमध्ये एका सेटमध्ये जो आघाडीवर राहिल तो अंतिम फेरीत धडक मारणार आहे. यातील विजेत्याचा मुकाबला यापूर्वीच अंतिम फेरीत पोहोचलेल्या अँडरसनसोबत होणार आहे.

लंडनमधील सेंटर कोर्ट येथे अंडर रुफ हा सामना शनिवारी पुन्हा सुरु होणार असून महिला एकेरीच्या अंतिम सामन्यापूर्वी हा सामना खेळवला जाईल. महिला एकेरीचा अंतिम सामना सेरेना विल्यम्स आणि अँजेलिक कर्बर यांच्यामध्ये होणार आहे.