राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांचं एक आगळं वेगळं रुप सोमवारी मुंबईतील एका कार्यक्रमात पहायला मिळालं. रिपब्लिक ऑफ कोरियाच्या मुंबईतील दुतावास कार्यालयाने महाराष्ट्रात तायक्वांदो स्पर्धेचं आयोजन केलं होतं. या स्पर्धेतील विजेत्यांना पंकजा मुंडे यांच्या हस्ते पारितोषिकं देण्यात आली. यावेळी पंकजा मुंडे यांनाही तायक्वांदो खेळातल्या काही कसरती करण्याच्या मोह आवरला नाही. यावेळी पंकजा मुंडेनी उपस्थित कोरियन खेळाडूशी तायक्वांदोचे काही डावपेच लढवले. या सोहळ्याला खासदार प्रीतम मुंडेही उपस्थित होत्या. पंकजा मुंडेंचा तायक्वांदो खेळातली आवड पाहता स्पर्धेच्या आयोजकांनी विशेष ‘ब्लॅकबेल्ट’ देत त्यांचा सत्कार केला. आपल्या फेसबूक पेजवरुन पंकजा मुंडे यांनी या सोहळ्याची काही क्षणचित्र शेअर केली आहेत.

PM Narendra Modi in Nagpur
पंतप्रधान नागपुरात, शनिवारी भाजप पदाधिकाऱ्यांशी चर्चा
BJP Manifesto PM Modi
गरीबांसाठी तीन कोटी घरे, मोफत रेशन योजना, घराघरांपर्यंत पाईपलाईनने गॅस; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केल्या मोठ्या घोषणा
Mahayuti gathering in Washim, Gyayak Patni,
महायुतीचा मेळावा : मंत्री व पालकमंत्री उपस्थित अन् खुर्चीवरून वाद !
kolhapur lok sabha marathi news, kolhapur sanjay mandlik latest news in marath
काँग्रेस नेत्यांशी मैत्री विसरा, भाजपचा महायुतीच्या नेतेमंडळींना संदेश

मुंबईत पार पडलेल्या या स्पर्धेत पंकजा मुंडेंचा पत्र आर्यमन पालवे यानेही सहभाग घेतला होता. ३ दिवस चाललेल्या या स्पर्धेत आर्यमनने ७३ किलो वजनी गटात सुवर्णपदकाची कमाई केली. या सोहळ्यादरम्यान कोरियन तायक्वांदो खेळाडूंनी श्वास रोखून धरणारी प्रात्यक्षिके सादर केली. मात्र संपूर्ण सोहळ्यात पंकजा मुंडेंनी कोर्टवर उतरुन तायक्वांदोतल्या कसरतींचा केलेला सराव हा चर्चेचा विषय ठरत होता. यावेळी उपस्थित खेळाडूंच कौतुक करताना पंकजा मुंडे यांनी आपणही तायक्वांदोचं प्रशिक्षण घेतल्याचं सांगितलं. या सोहळ्याला पंकजा मुंडेंचे पती अमित पालवे यांनीही हजेरी लावली होती.

पंकजा मुंडे यांचा विशेष ब्लॅक बेल्ट देऊन सत्कार करण्यात आला

 

पंकजा मुंडेचा मुलगा आर्यमनने ७३ किलो वजनी गटात सुवर्णपदक मिळवलं

 

सुवर्णपदकासह आर्यमन आपले वडील अमित पालवे यांच्यासोबत