भारत आणि ऑस्ट्रेलिया संघामध्ये झालेल्या टी २० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत पहिल्या सामन्यात भारताने विजय मिळवला. भारतीय संघाने विजय जरी मिळवला असला तरी चर्चा हरमनप्रीत कौरच्या बाद होण्याची आहे. हरमनप्रीत बाद झाल्यानंतर विकेटकीपरने सुद्धा डोक्याला हात लावला. वरच्या फळीतील दोन्ही खेळाडू बाद झाल्याने भारतीय संघाची धावसंख्या मंदावली होती.

जोनासेलच्या गोलंदाजीवर हरमनप्रीतने पुढे येवून खेळण्याचा प्रयत्न केला. मात्र चेंडू सरळ विकेटकीपर कडे गेला. विकेटकीपरच्या हातात चेंडू येण्याआधीच पॅडला लागून तो स्टंम्पला लागला. हरमनप्रीतच्या लक्षात येण्याआधीच ती बाद झाली. त्यानंतर विकेटकीपरने डोक्याला हात लावला. T20 World Cupच्या ट्विटर पेजवर हा व्हिडिओ पोस्ट केला आहे.

जेमायमा रॉड्रीग्ज (२६) आणि दिप्ती शर्मा (४९*) या दोघींच्या भागीदारीच्या जोरावर भारताने २० षटकात ४ बाद १३२ धावा केल्या आणि ऑस्ट्रेलियाला १३३ धावांचे आव्हान दिले. आव्हानाचा पाठलाग करताना सलामीवीर हेली हिने अर्धशतकी केली, पण पूनम यादवच्या फिरकीपुढे यजमान ऑस्ट्रेलियाने गुडघे टेकले. या विजयासह भारताने स्पर्धेत विजयी सलामी दिली.