ICC World Cup 2019 या स्पर्धेसाठी १५ एप्रिलला भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. या संघात अंबाती रायडू आणि विजय शंकर यांच्यातील कोणाला संधी मिळणार याबाबत प्रश्न होता. पण अखेर विजय शंकर याला संघात स्थान देण्यात आले. निदाहास ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात विजय शंकरने केलेली कामगिरी अत्यंत सुमार होती. तो सामना दिनेश कार्तिकच्या शेवटच्या चेंडुवरील षटकारामुळे भारताला जिंकणे शक्य झाले होते. तेव्हा विजय शंकरवर टीका झाली होती. पण त्यानंतर त्याने अंदाजे वर्षभराच्या काळात आपल्या खेळात सुधारणा केली आणि त्याचे फळ त्याला मिळाले.

World Cup 2019 : विश्वचषकासाठीच्या टीम इंडियामध्ये कमतरता – गंभीर

विजयला विश्वचषक स्पर्धेसाठीच्या संघात स्थान मिळाल्यानंतर त्याला एका मुलाखतीत ‘असा कोणता क्षण होता ज्यामुळे तुझ्या क्रिकेट कारकिर्दीला कलाटणी मिळाली?’ असा एक प्रश्न विचारण्यात आला. त्यावर बोलताना तो म्हणाला की निदाहास ट्रॉफीचा अंतिम सामना हा माझ्या क्रिकेट कारकिर्दीला कलाटणी देणारा क्षण होता. आता त्या गोष्टीला जवळपास वर्ष झालं. पण माझी कामगिरी खराब झाली हे मला माहिती होते, म्हणूनच त्यातून बाहेर पडणे माझ्यासाठी किती कठीण होते, हे साऱ्यांनीच पाहिले.

How to make solkadhi marathi recipe
recipe : चिकन, मटणाच्या जेवणासह हवी थंडगार सोलकढी? मालवणी पद्धतीने कशी बनवायची जाणून घ्या
man died due to lightning fall in unseasonal stormy rain
बुलढाणा : वादळी पाऊस, गारपीटपासून जीव वाचवण्यासाठी ‘पोकलॅन’खाली आसरा घेतला; मात्र…
What can you do to reduce back pain
स्त्री आरोग्य : कंबरदुखीने त्रस्त आहात?
Garbage picker to video journalist Maya Khodve Journey
कचरा वेचक ते व्हिडिओ जर्नलिस्ट! माया खोडवे यांच्या जिद्दीचा प्रवास
विजय शंकर

 

त्यावेळी मला भारतभरातून प्रसारमाध्यमांच्या अनेक प्रतिनिधींचे फोन आले. सगळ्यांनी मला समान प्रश्न विचारला. सोशल मीडियावरही माझ्यावर प्रचंड टीका झाली. त्यामुले खूपच खजील झालो. त्यातुन बाहेर पडण्यासाठी मला थोडा जास्तच वेळ लागला. पण अजाणतेपणी मला त्यातून एक गोष्ट समजली की एखादी परिस्थिती कशी हाताळावी… त्या घटनेने मला शिकवलं की १ वाईट दिवस म्हणजे जगाचा अंत नाही. असे केवळ माझ्याबाबतीत झाले असे नाही, तर अनेक मोठ्या खेळाडूंच्या बाबतीत अशा घटना घडल्या आहेत, असेही त्याने म्हटले.

BCCI च्या मुंबई येथील मुख्यालयात कर्णधार विराट कोहली आणि निवड समिती सदस्य यांच्या उपस्थितीमध्ये एक बैठक घेण्यात आली. या बैठकीनंतर संघाची घोषणा केली. यात कर्णधार विराट कोहली, उपकर्णधार रोहित शर्मा, शिखर धवन, जसप्रीत बुमराह, महेंद्रसिंग सिंग धोनी, मोहम्मद शमी, हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहल या खेळाडूंची संघातील जागा पक्की मानली जात होतीच. पण बैठकीत संघातील इतर चार ते पाच जागांसाठी प्रामुख्याने चर्चा करण्यात आली. त्यात लोकेश राहुल, केदार जाधव, दिनेश कार्तिक आणि रवींद्र जाडेजा यांच्याबरोबरच विजय शंकर याचे नाव घेण्यात आले, तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.