नवी दिल्ली : जागतिक स्पर्धेत कांस्यपदकाची कमाई करणारा कुस्तीपटू राहुल आवारेला करोनाची बाधा झाली आहे. राष्ट्रीय शिबिरासाठी सोनीपत येथील भारतीय क्रीडा प्राधिकरणात (साइ) दाखल झाल्यानंतर त्याला करोना झाल्याचे समोर आले आहे.

विनेश फोगट, दीपक पुनिया, नवीन आणि कृष्णन याच्यानंतर करोनाची लागण झालेला राहुल हा भारताचा पाचवा कुस्तीगीर ठरला आहे. ‘‘आवारेला रुग्णालयात दाखल केले असून, त्याच्या प्रकृतीवर ‘साइ’चे डॉक्टर लक्ष ठेवून आहेत. शिबिरासाठी दाखल झाल्यापासून तो विलगीकरणात असून तो अन्य कोणत्याही खेळाडूच्या संपर्कात आलेला नाही,’’ असे ‘साइ’च्या पत्रकात म्हटले आहे.

दरम्यान, दीपकला रुग्णालयातून ‘साइ’ केंद्रात विलगीकरणासाठी स्थलांतरित केले आहे. विनेश हीसुद्धा या आजारातून सावरली आहे.