लॉकडाउनपश्चात टीम इंडिया आपल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय दौऱ्यासाठी सज्ज झाली आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ सध्या सिडनीत असून २७ नोव्हेंबरपासून भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला सुरुवात होते आहे. या दौऱ्याआधीच भारतीय संघाला दुखापतींनी ग्रासलं आहे. टी-२० संघात स्थान मिळालेल्या वरुण चक्रवर्तीला आपलं स्थान गमवावं लागलं असून, रोहित शर्माही पूर्णपणे फिट नसल्यामुळे त्याला फक्त कसोटी संघात स्थान देण्यात आलं आहे. त्यातचं कसोटी संघात स्थान मिळालेला यष्टीरक्षक वृद्धीमान साहादेखील दुखापतग्रस्त असल्यामुळे भारतीय संघाच्या चिंतेत वाढ झाली आहे.

अवश्य वाचा – विराट कोहलीने टी-२० चं कर्णधारपद सोडण्याची वेळ आलेली आहे – नासिर हुसैन

परंतू बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांच्या म्हणण्यानुसार वृद्धीमान साहा कसोटी मालिकेआधी तंदुरुस्त झाला असेल. “BCCI चं कामकाज कसं चालतं हे लोकांना माहिती नसावं. ट्रेनर, फिजीओ आणि स्वतः साहाला पूर्णपणे कल्पना आहे, सध्या त्याच्या हॅमस्ट्रींग इंज्युरीवर उपचार सुरु आहेत. कसोटी मालिकेपर्यंत तो नक्कीच फिट होईल. मर्यादीत षटकांचं क्रिकेट तो खेळत नाहीये.” The Week मासिकाला दिलेल्या मुलाखतीत गांगुलीने साहाच्या दुखापतीबद्दल माहिती दिली.

अवश्य वाचा – इशान किशन आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी तयार, घेऊ शकतो संघात धोनीची जागा – एम. एस. के. प्रसाद

१७ डिसेंबरपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार आहे. अ‍ॅडलेडच्या मैदानावर पहिला दिवस-रात्र कसोटी सामना खेळल्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली माघारी परतणार आहे. पत्नी अनुष्काची बाळंतपणात काळजी घेण्यासाठी विराटला बीसीसीआयने रजा मंजूर केली आहे.