चंदिगढ येथे ७ ते १० नोव्हेंबर या कालावधीत होणाऱ्या पंजाबविरुद्धच्या रणजी साखळी सामन्यासाठी मुंबईच्या संघात सूर्यकुमार यादव आणि सुशांत मराठे या फलंदाजांचा तर क्षेमल वायंगणकर या वेगवान गोलंदाजाचा समावेश करण्यात आला आहे. मुंबईने लाहली येथे हरयाणाविरुद्धच्या पहिल्या रणजी सामन्यात निर्णायक विजय मिळवला होता. सचिन तेंडुलकरच्या कारकीर्दीतील तो अखेरचा रणजी सामना होता. तथापि, अजिंक्य रहाणेची भारताच्या कसोटी संघात निवड झाल्यामुळे तो अनुपलब्ध असेल. याचप्रमाणे दुखापतीमुळे धवल कुलकर्णी दुसऱ्या सामन्यात खेळणार नाही. त्यामुळे त्याच्या जागी क्षेमल याला संघात स्थान मिळाले आहे.
मुंबईचा संघ : झहीर खान (कर्णधार), अभिषेक नायर (उपकर्णधार), वसिम जाफर, कौस्तुभ पवार, हिकेन शाह, आदित्य तरे (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, इक्बाल यादव, सुशांत मराठे, विशाल दाभोळकर, सुफियान शेख (यष्टीरक्षक), सिद्धेश लाड, जावेद खान, बलविंदरसिंग संधू (ज्यु.), क्षेमल वायंगणकर.