News Flash

VIDEO : बायकोच्या दबावापुढे झुकला ‘सिक्सर किंग’ युवराज सिंग..! बदलला आपला लूक

इंस्टाग्रामवर स्टोरी आणि पोस्ट अपलोड करत युवीने आपला नवीन लूक सर्वांसमोर आणला

युवराज सिंगचा नवा लूक

भारतीय क्रिकेट संघाचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंगने सोशल मीडियावर आपला नवा लूक उघडकीस आणला आहे. इंस्टाग्रामवर स्टोरी आणि पोस्ट अपलोड करत त्याने आपला नवीन लूक सर्वांसमोर आणला. हा लूक करताना त्याची पत्नी हेजल कीचही उपस्थित होती. युवराज सिंगने पुन्हा एकदा लांब केसांचे रुपांतर कुरळ्या केसात केले आहे.

इन्स्टाग्रामवर व्हिडिओ अपलोड करताना युवराज सिंगने कॅप्शनमध्ये प्रश्न विचारला आहे. लांब केस किंवा कुरळे केस? मला कुरळे केस आवडतात, तुम्हाला कोणता लूक आवडतो?, असा प्रश्न युवीने चाहत्यांना विचारला आहे. हा लूक करताना हेजलने माझ्यावर दबाव टाकला, असेही युवीने सांगितले.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Yuvraj Singh (@yuvisofficial)

अलीकडेच युवराज सिंगने सचिन तेंडुलकर आणि अजित आगरकर यांच्याबरोबर गोल्फ खेळतानाचे फोटो अपलोड केले होते. युवराज आता वेस्ट इंडिजचा सलामीवीर ख्रिस गेल याच्यासोबत एकत्र खेळताना दिसू शकतो. हे दोन्ही खेळाडू या मेलबर्नमधील कम्युनिटी क्रिकेट क्लबकडून खेळू शकतात. युवराज आणि गेल यांची क्लबकडून खेळण्याची ८५ ते ९० टक्के शक्यता आहे, असा दावा मुलग्रेव क्रिकेट क्लबचे अध्यक्ष मालीन पुलेनेघम यांनी केला आहे.

हेही वाचा – VIDEO : ‘‘जो बीवी से करे प्यार वो…”, चहल-धनश्रीने केली एकमेकांची ‘चंपी’!

मुलग्रेव क्रिकेट क्लबने सनथ जयसूर्या याची मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. मेलबर्नमध्ये स्थायिक झालेल्या तिलकरत्ने दिलशानने मागील मोसमात या संघासाठी सहा सामने खेळले होते. युवराज सिंग ही ऑफर स्वीकारणार का नाही, हे पाहणे रंजक ठरेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 27, 2021 3:15 pm

Web Title: yuvraj singh changes his hairstyle under the pressure of his wife adn 96
Next Stories
1 Euro Cup २०२०: नेदरलँड विरुद्ध चेक रिपब्लिक सामना; तर बेल्जियमसमोर पोर्तुगालचं कडवं आव्हान
2 Euro Cup 2020 : ऑस्ट्रियाला हरवून इटलीची उपांत्यपूर्व फेरीत धडक; अतिरिक्त वेळेत २-१ने पराभव
3 डेन्मार्कचा वेल्सला दणका
Just Now!
X