VIDEO : ‘‘जो बीवी से करे प्यार वो…”, चहल-धनश्रीने केली एकमेकांची ‘चंपी’!

साडेपाच लाखांहून अधिक वेळा पाहिला गेलाय चहल-धनश्रीचा हा व्हिडिओ

Yuzvendra Chahal and Dhanashree were seen doing hair massage of each other
चहल आणि धनश्रीचा चंपी व्हिडिओ
भारतीय फिरकीपटू यजुर्वेंद्र चहल सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असतो. आपल्या चाहत्यांसाठी तो अनेक फोटो-व्हिडिओ शेअर करतो. त्याची पत्नी धनश्री वर्मा कधी कधी डान्सचे व्हिडिओ, तर कधी तिचे फोटो शेअर करत असते. यजुर्वेंद्र चहलने शनिवारी इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला, या व्हिडिओ तो आणि धमश्री एकमेकांची चंपी करताना दिसून आले.

”जो बीवी से करे प्यार, वो चम्पी से कैसे करे इन्कार”, असे चहलने या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे. हा व्हिडिओ एका कंपनीची जाहिरात आहे, परंतु या व्हिडिओमधील दोघांचा अभिनय आणि केमिस्ट्री चाहत्यांना खूप आवडली आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत साडेपाच लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Yuzvendra Chahal (@yuzi_chahal23)

हेही वाचा – खेलरत्न पुरस्कारासाठी पीआर श्रीजेश, तर अर्जुन पुरस्कारासाठी हरमनप्रीतची शिफारस

श्रीलंका दौर्‍यासाठी चहलची भारतीय संघात निवड झाली आहे. शिखर धवनच्या नेतृत्वात तो खेळताना दिसणार आहे. श्रीलंकेविरुद्ध १३ जुलैपासून सुरू होणार्‍या मालिकेत तीन एकदिवसीय सामने आणि तीन टी-२० सामने आहेत. आगामी टी-२० वर्ल्डकपचा विचार करता चहलसाठी ही मालिका खूप महत्वाची आहे. यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये टी-२० वर्ल्डकप आयोजित केला जाणार आहे.

इंग्लंडविरुद्ध चहलची खराब कामगिरी

३० वर्षीय चहलला इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेच्या पहिल्या तीन सामन्यांमध्ये संधी देण्यात आली होती, पण तो केवळ ३ विकेट घेऊ शकला आणि त्याने अधिक धावाही दिल्या. यामुळे अखेरच्या दोन सामन्यात लेगस्पिनर राहुल चहरचा त्याच्या जागी समावेश करण्यात आला होता. श्रीलंकेची खेळपट्टी फिरकीपटू अनुकूल मानली जाते, म्हणून चहलला आपल्या कामगिरीत सुधारणा घडवून आणता येईल.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Yuzvendra chahal and his wife dhanashree were seen doing hair massage of each other adn