वृत्तसंस्था, लंडन

भारताचा विश्वविजेता माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी, माजी अष्टपैलू युवराज सिंग, सुरेश रैना, तसेच महिला संघाची माजी कर्णधार मिताली राज आणि वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामी या भारतीयांसह १७ जणांना इंग्लंडमधील प्रतिष्ठेच्या मरिलीबोन क्रिकेट क्लबने (एमसीसी) मानद आजीवन सदस्यत्व बहाल केले आहे.

IPL 2024 Lucknow Super Giants vs Chennai Super Kings Match Updates in Marathi
CSK vs LSG सामन्यानंतर IPL कडून दोन्ही संघांच्या कर्णधारांवर कारवाई, ऋतुराज-राहुलला १२ लाखांचा दंड
IPL 2024 Punjab Kings vs Mumbai Indians Match Updates in Marathi
IPL 2024: आशुतोष शर्माची आयपीएलमध्ये ऐतिहासिक कामगिरी, १७ वर्षांच्या इतिहासात ही कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय खेळाडू
Top 5 Oldest Player To Score A Century In IPL
IPL 2024 : रोहित शर्मासह ‘या’ पाच सर्वात वयस्कर खेळाडूंनी आयपीएलमध्ये झळकावलयं शतक, जाणून घ्या कोण आहेत?
RR vs GT Match Updates Dhanshree Verma wished her husband Yuzvendra Chahal who played 150th IPL Match
RR vs GT : धनश्री वर्माने १५०वा आयपीएल सामना खेळणाऱ्या युजवेंद्र चहलला दिल्या खास शुभेच्छा, VIDEO होतोय व्हायरल

‘‘२००७चा ट्वेन्टी-२० विश्वचषक आणि २०११चा एकदिवसीय विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचे महेंद्रसिंह धोनी आणि युवराज सिंग हे प्रमुख सदस्य होते. सुरेश रैनाने १३ वर्षांच्या कारकीर्दीत ५५०० हून अधिक एकदिवसीय धावा केल्या,’’ असे ‘एमसीसी’ने आपल्या निवेदनात म्हटले आहे.
‘एमसीसी’ने मिताली आणि झुलन यांच्या योगदानाचाही विशेष उल्लेख केला. ‘‘गेल्या वर्षी लॉर्डसवर इंग्लंडविरुद्ध कारकीर्दीतील अखेरचा सामना खेळणारी झुलन एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक २५५ बळींच्या विक्रमाची मानकरी आहे. दुसरीकडे मितालीने २११ डावांमध्ये सर्वाधिक ७८०५ धावा केल्या आहेत,’’ असे ‘एमसीसी’ने म्हटले आहे.

आजीवन सदस्यत्व मिळालेल्यांची नावे

महेंद्रसिंह धोनी, युवराज सिंग, सुरेश रैना, झुलन गोस्वामी, मिताली राज (सर्व भारत), केव्हिन पीटरसन, इऑन मॉर्गन, जेनी गन, लॉरा मार्श, अन्या श्रूबसोल (सर्व इंग्लंड), एमी सॅटरवेट व रॉस टेलर (न्यूझीलंड), मेरिसा अगुइलेरा (वेस्ट इंडिज), मोहम्मद हाफिज (पाकिस्तान), रेचल हेन्स (ऑस्ट्रेलिया), मश्रफी मुर्तझा (बांगलादेश), डेल स्टेन (दक्षिण आफ्रिका)