ENG vs IND : विराटनं काढली फक्त एक धाव अन् क्रिकेटच्या देवाला टाकलं मागे!

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या कसोटीत नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.

virat
ENG vs IND : विराटनं काढली फक्त एक धाव अन् क्रिकेटच्या देवाला टाकलं मागे!

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या कसोटीत नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वेगाने २३ हजार धावा करण्याचा विक्रम त्याच्या नावावर प्रस्थापित झाला आहे. वेगवान धावा करण्याच्या यादीत त्याने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टींगसारख्या दिग्गजांना मागे टाकलं आहे. विराटने ओवलमध्ये इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या कसोटीत एक धाव करत २३ हजार धावा पूर्ण केल्या. हा विक्रम प्रस्थापित करणारा जगातला सातवा खेळाडू ठरला आहे आणि भारताचा तिसरा खेळाडू ठरला आहे.

विराटने ४९० डावात त्याने २३ हजार धावा पूर्ण केल्या आहेत. तर सचिनने तेंडुलकरने ५२२ डावांमध्ये हा विक्रम प्रस्थापित केला होता. रिकी पॉन्टिंगने ५४४, जॅक कॅलिसनं ५५१, कुमार संगकाराने ५६८, राहुल द्रविडने ५७६ आणि महेला जयवर्धनेनं ६४५ डावात हा विक्रम प्रस्थापित केला आहे.

२३ हजार करणारे खेळाडू

  • ४९० विराट कोहली*
  • ५२२ सचिन तेंडुलकर
  • ५४४ रिकी पॉटिंग
  • ५५१ जॅक कॅलिस
  • ५६८ कुमार संगकारा
  • ५७६ राहुल द्रविड
  • ६४५ महेला जयवर्धने

विराट कोहलीने कर्णधार म्हणून धोनीचा एक खास विक्रमही मागे टाकला आहे. इंग्लंडविरुद्ध चौथी कसोटी सुरु झाल्यानंतर कोहली आता इंग्लंडमध्ये सर्वाधिक सामन्यांचे नेतृत्व करणारा भारतीय कर्णधार बनला आहे. इंग्लंडमध्ये कर्णधार म्हणून कोहलीचा हा १० वा सामना आहे. यापूर्वी इंग्लंडमध्ये कर्णधार म्हणून धोनीने ९ कसोटी सामन्यांमध्ये कर्णधारपद भूषवले होते. दुसरीकडे, कर्णधार विराट कोहलीकडून इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीत मोठ्या धावसंख्येची अपेक्षा आहे. त्याने मागच्या ५१ डावात एकही शतक झळकावलेलं नाही. २०१९ पासून त्याला फलंदाजात सूर गवसलेला नाही. विराटने शेवटचं शतक २०१९ मध्ये बांगलादेश विरुद्ध खेळल्या गेलेल्या पिंक बॉल कसोटी झळकावलं होतं. विराटने इंग्लंड विरुद्धच्या तीन कसोटी सामन्यातील पाच डावात २४.८० च्या सरासरीने १२४ धावा केल्या आहेत. तर एकच अर्धशतक झळकावलं आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: 23 thousand runs record in the name of virat kohli rmt

ताज्या बातम्या