Batsman throws bat after run-out Video Viral: आयुष्यात अशा अनेक घटना घडतात, ज्यात आपल्याला काहीतरी वेगळं करायचं असतं आणि नकळत काहीतरी वेगळंच घडतं. क्रिकेट विश्वातील एक असाच व्हिडीओ व्हायरल होत आहे. नुकत्याच व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमध्ये एका फलंदाजाने रनआऊट झाल्यानंतर असं काही केलं की, ज्यामुळे दुसऱ्या फलंदाजाला गंभीर दुखापत होतो-होत राहिली. आता या व्हायरल व्हिडीओ लोक कमेंट करत आहेत की रनआऊट होण्यापेक्षा वाईट काहीही नाही.

वास्तविक, २५ ऑगस्टच्या रात्री ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर Movie And Cric नावाच्या हँडलरवर एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ कुठल्या मॅचचा आहे. हे माहीत नसले, तरी खूपच रंजक आहे. यामध्ये शॉट खेळल्यानंतर दोन्ही फलंदाज धावा काढण्याचा प्रयत्न करताना दिसतात. योगायोगाने, त्यातील नॉन स्ट्राइकचा फलंदाज धाव पूर्ण करू शकला नाही आणि त्याला क्रीजवर परतावे लागले. या प्रयत्नात एक तो रनआऊट होतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यानंतर त्याला रनआऊट झाल्याने राग येतो. त्यानंतर पॅव्हेलियनमध्ये परतताना तो बॅट हवेत फेकतो. ती बॅट सरळ त्याच्याच सहकाऱ्याच्या जबड्यावर जाऊन आदळली. तथापि, हे देखील स्पष्ट आहे की, रनआऊट झालेल्या फलंदाजाने रागात हे कृत्य केले. त्याला जाणूनबुजून कोणाला बॅट फेकून मारायची नव्हती, पण त्याच्याकडून ही चूक होते. या घटनेचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.