Women’s T20 WC 2020 : स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा ८५ धावांनी पराभव करत पाचवे टी २० विश्वविजेते पटकावले. सलामीवीर एलिसा हेली (७५) आणि बेथ मूनी (७८*) यांच्या फटकेबाजीच्या बळावर ऑस्ट्रेलियाने ४ बाद १८४ धावांची मजल मारली. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय महिला फलंदाजांनी अत्यंत दीनवाणी कामगिरी केली आणि विजेतेपदाची संधी गमावली.

T20 World Cup : भारताच्या पराभवावर सेहवागने मांडलं स्पष्ट मत, म्हणाला…

पराभवानंतर भारतीय संघातील खेळाडू हवालदिल झाल्याचे दिसून आले. त्यानंतर अनेकांनी त्यांना धीर दिला आणि त्यांच्या स्पर्धेतील कामगिरीचे कौतुक केले. पण एका पाकिस्तानी चाहत्याने मात्र भारतीय संघाला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. त्यावर त्याला माजी भारतीय क्रिकेटपटूकडून सडेतोड उत्तर मिळालं.

“आम्हाला तुमचा अभिमान आहे”; विराटने महिला संघाला दिला धीर

भारताचा माजी क्रिकेटपटू आणि समालोचक आकाश चोप्रा याने भारतीय संघाच्या पराभवानंतर त्यांना धीर देणारं ट्विट केलं होतं. ‘भारत आणि ऑस्ट्रेलिया दोन्ही संघ स्पर्धेत केवळ १-१ सामना हारले. तो पराभवदेखील एकमेकांविरोधात झाला. स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात भारत जिंकला तर अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलिया विजयी झाला. यालाच जीवन म्हणतात’, असे ट्विट त्याने केले. त्यावर एका पाकिस्तानी चाहत्याने भारतीय संघाला ट्रोल करण्यासाठी २०१७ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलची आठवण करून दिली.

T20 World Cup : भारतीय महिला संघाचं शरद पवारांनी केलं कौतुक, म्हणाले…

त्या पाकिस्तानी चाहत्याला आकाश चोप्राने सडेतोड उत्तर दिले. ‘तुमचा संघ त्या विजयानंतर किती वेळा आयसीसीच्या स्पर्धांमध्ये बाद फेरीत पोहोचला ते सांगा. ज्यांची घरं काचेची असतात, ते दिवे चालून ठेऊन कपडे बदलत नाहीत’, असं सणसणीत प्रत्युत्तर त्याने चाहत्याला दिलं.

T20 World Cup : हृदयद्रावक! पराभवानंतर १६ वर्षीय शफालीला अश्रू अनावर

दरम्यान, अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी केली. ऑस्ट्रेलियन सलामीवीर बेथ मूनी आणि एलिसा हेली यांच्या धडाकेबाज सुरूवात केली. एलिसा हेलीने ३९ चेंडूत ७ चौकार आणि ५ षटकारांसह ७५ धावा केल्या. तर बेथ मूनीने जबाबदारीने खेळ करत नाबाद ७८ धावांची खेळी केली. ऑस्ट्रेलियाने दिलेल्या १८४ धावांचे आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा संघ ८५ धावांनी पराभूत झाला.