डरबन : जगभरात सुरू असलेल्या व्यावसायिक ट्वेन्टी-२० लीगचा द्विपक्षीय मालिकांवर विपरीत परिणाम होत असून, यामुळेच दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्या दरम्यान झालेल्या मालिकेत दोनच कसोटी सामने खेळण्यात आले, अशी टीका दक्षिण आफ्रिकेचा माजी खेळाडू एबी डिव्हिलियर्सने व्यक्त केली आहे.‘‘क्रिकेटमध्ये काहीही बदल होत आहे. पण, हा बदल पूरक वाटत नाही. सर्वोत्तम संघ हवा असेल, तर दोन देशांमध्ये प्रदीर्घ मालिका होण्याची गरज आहे,’’ असे डिव्हिलियर्स म्हणाला.

‘‘व्यावसायिक लीगला अवास्तव महत्त्व मिळू लागले आहे. संघटना पातळीवर काही तरी गोंधळ आहे. क्रिकेटमधील सर्वोत्तम स्पर्धा पाहायची असेल, तर कसोटी क्रिकेट वाढले पाहिजे. यातूनच सर्वोत्तम क्रिकेट बघायला मिळते. हे चित्र दिसण्यासाठी काही तरी बदल घडणे आवश्यक आहे,’’ असे मतही डिव्हिलियर्सने मांडले.‘‘भविष्यात खेळाडू आणि प्रशिक्षक जेथे जास्त पैसा मिळेल तेथे जाताना दिसतील यात शंका नाही. पण, त्यामुळे क्रिकेटचे नुकसान होत आहे. केवळ व्यावसायिक लीगच्या तारखा अडसर ठरत असल्यामुळे दक्षिण आफ्रिका न्यूझीलंड दौऱ्यासाठी आपला दुसऱ्या फळीचा संघ पाठवणार आहे. या संघातून तब्बल सात खेळाडू आंतरराष्ट्रीय पदार्पण करणार आहेत. हे निश्चित कल्पनाशक्तीच्या पलीकडचे आहे,’’ असेही डिव्हिलियर्स म्हणाला.

हेही वाचा >>>भविष्यात प्रशिक्षक बनण्याची डेव्हिड वॉर्नरची इच्छा

जगभरात वेगवेगळ्या ट्वेन्टी-२० लीग सुरू आहेत. त्यामुळेच भारत व दक्षिण आफ्रिका कसोटी मालिका दोन सामन्यांचीच झाली, अशी टीका माजी क्रिकेटपटू ए.बी. डिव्हिलियर्सने केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

केपटाऊनची खेळपट्टी नेहमीच गोलंदाजांना मदत करते. अशा खेळपट्टीवर गोलंदाजांना उजव्या यष्टीबाहेर चेंडू टाकण्यापासून रोखायचे असते. फलंदाजांना तेच जमले नाही. दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना भारतीय गोलंदाजांचा सामना करताना अडथळा येत होता. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेला पराभवाचा सामना करावा लागला. – एबी डिव्हिलियर्स