India vs Pakistan, Asia Cup 2025: भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ आशिया चषक स्पर्धेत आमनेसामने येणार की नाही हा मुद्दा तुफान चर्चेत आहे. पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यात अनेक निष्पाप भारतीयांना आपला जीव गमवावा लागला होता. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. याचा निषेध म्हणून इंडिया चॅम्पियन्स संघाने पाकिस्तानविरुद्धच्या सेमीफायनलच्या सामन्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. पण आता आशियाई क्रिकेट महासंघाने कुठल्याही स्थितीत भारत – पाकिस्तान सामना होणार असल्याचे संकेत दिले आहेत.
क्रिकेटचा सामना हा देशवासीयांपेक्षा मोठा नाही. त्यामुळेच वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लेजेंड्स या स्पर्धेत भारतीय संघाने २ वेळा पाकिस्तानसोबत खेळण्यास नकार दिला होता. दरम्यान शनिवारी आशियाई क्रिकेट महासंघाने या स्पर्धेच्या वेळापत्रकाची घोषणा केली आहे.
येत्या २०२६ मध्ये टी -२० वर्ल्डकप स्पर्धेचा थरार रंगणार आहे. हा स्पर्धा पाहता आशिया चषक २०२५ स्पर्धा टी – २० फॉरमॅटमध्ये खेळवली जाणार आहे. गेल्या वेळी जेव्हा ही स्पर्धा खेळवली गेली होती, त्यावेळी वनडे फॉरमॅटमध्ये खेळवली गेली होती. कारण भारतात २०२३ वनडे वर्ल्डकप स्पर्धेचा थरार रंगणार होता.
भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणारा सामना हा १४ सप्टेंबरला दुबईत रंगणार आहे. तर भारतीय संघाचा पहिला सामना १० सप्टेंबरला युएईविरुद्ध होणार आहे. हे सर्व सामने अबुधाबी आणि दुबईत खेळवले जाणार आहेत.
आशिया चषक २०२५ स्पर्धेचं संपूर्ण वेळापत्रक
९ सप्टेंबर (मंगळवार), अफगाणिस्तान विरुद्ध हाँगकाँग, अबुधाबी
१० सप्टेंबर (बुधवार), भारत विरुद्ध युएई, दुबई
११ सप्टेंबर ( गुरुवार), बांगलादेश विरुद्ध हाँगकाँग, अबुधाबी
१२ सप्टेंबर ( शुक्रवार), पाकिस्तान विरुद्ध ओमान, दुबई
१३ सप्टेंबर ( शनिवार), बांगलादेश विरुद्ध श्रीलंका, अबुधाबी
१४ सप्टेंबर (रविवार), भारत विरुद्ध पाकिस्तान, दुबई
१५ सप्टेंबर ( सोमवार), युएई विरुद्ध ओमान, अबुधाबी
१५ सप्टेंबर ( सोमवार) श्रीलंका विरुद्ध हाँगकाँग, दुबई
१६ सप्टेंबर (मंगळवार), बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान, दुबई
१७ सप्टेंबर (बुधवार), पाकिस्तान विरुद्ध युएई, अबुधाबी
१८ सप्टेंबर ( गुरुवार), श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान, दुबई
१९ सप्टेंबर ( शुक्रवार), भारत विरुद्ध ओमान, अबुधाबी
सुपर ४
२० सप्टेंबर ( शनिवार), ग्रुप बी क्वालिफायर १ विरुद्ध ग्रुप बी क्वालिफायर २, दुबई
२१ सप्टेंबर (रविवार), ग्रुप ए क्वालिफायर १ विरुद्ध ग्रुप ए क्वालिफायर २ दुबई
२२ सप्टेंबर (सोमवार) विश्रांती
२३ सप्टेंबर (मंगळवार) ग्रुप ए क्वालिफायर १ विरुद्ध ग्रुप बी क्वालिफायर २, अबुधाबी
२४ सप्टेंबर (बुधवार), ग्रुप ए क्वालिफायर १ विरुद्ध ग्रुप बी क्वालिफायर २, दुबई
२५ सप्टेंबर (गुरुवार), ग्रुप ए क्वालिफायर २ विरुद्ध ग्रुप बी क्वालिफायर २, दुबई
२६ सप्टेंबर (शुक्रवार), ग्रुप ए क्वालिफायर १ विरुद्ध ग्रुप बी क्वालिफायर, दुबई
२७ सप्टेंबर (शनिवार) विश्रांती
२८ सप्टेंबर (रविवार) अंतिम सामना