Actor Sunil Shetty warns son in law KL Rahul: या वर्षाच्या सुरुवातीला भारताचा सलामीवीर केएल राहुलने बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टीची मुलगी आणि अभिनेत्री अथिया शेट्टीशी लग्न केले होते. या वर्षाच्या सुरुवातीला, जानेवारीमध्ये सुनील शेट्टीच्या फार्महाऊसवर लग्न करण्यापूर्वी दोघे ३-४ वर्षे एकमेकांना डेट करत होते. आता केएल राहुल मांडीवर झालेल्या शस्त्रक्रियेतून बरा झाला आहे.

आयपीएल २०२३ मध्ये झालेल्या दुखापतीनंतर भारतीय यष्टीरक्षक-फलंदाजवर लंडनमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यावेळी त्याच्यासोबत पत्नी अथिया शेट्टीही होती. केएल राहुलचे सासरे सुनील शेट्टी हे त्यांच्या बोल्ड मुलाखतींसाठी ओळखले जातात. अलीकडेच सुनील शेट्टीने एका मुलाखतीत जावई केएल राहुलला कडक ताकीद दिली आहे.

‘मिड-डे’ला दिलेल्या मुलाखतीत सुनील शेट्टीने मुलगी आणि जावायाल यशस्वी नात्याबद्दल खास सल्ला दिला. त्याने आपल्या जावयाला इशारा दिली की, त्याने खूप चांगला मुलगा होऊ नये. त्याने अथियाला केएल राहुलला त्याच्या चढ-उताराच्या वेळी साथ देण्यास सांगितले.

हेही वाचा – Yash Dhull: ‘विराट भैया आणि माझ्यात एक खास…’; यश धुलचे विराट कोहलीबद्दल मोठं वक्तव्य

जेव्हा सुनील शेट्टीला विचारण्यात आले की, तो अथियाला काय सल्ला देईल, तेव्हा तो म्हणाला, ‘ जो व्यक्ती आपल्या जोडीदारावर डोळे बंद करुन विश्वास ठेवतो. त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवावा. तो एक अॅथलीट आहे, तो प्रवास करेल, तुम्ही त्याच्याबरोबर सर्व वेळ राहू शकणार नाही. अभिनेत्यांप्रमाणेच खेळाडूही चढ-उतार पाहतात. जेव्हा तो स्कोअर करतो, तेव्हा तो वेगळ्या झोनमध्ये असतो.”

सुनील शेट्टीने जावई केएल राहुललाही दिला इशारा –

तसेच सुनील शेट्टीला जावईबद्दल काही बोलणार का? असे विचारले असता तो म्हणाला की, “इतका प्रेमळ व्यक्ती बनू नको. इतका चांगला मुलगा होऊ नको की सगळ्यांना वाटेल की तुमच्यापेक्षा चांगुलपणाच सर्व काही आहे. तो अशा प्रकारचा आहे. तो एक चांगला मुलगा आहे. मी नेहमी अथियाला सांगतो की तू धन्य आहेस. अर्थात, अथिया एक सुंदर मुलगी आहे पण माझी पत्नी, माझी आई, माझी वहिनी, माझी बहीण हे सर्व राहुलचे चाहते आहेत.”

हेही वाचा – ODI World Cup 2023: ‘…तर हा अन्याय होईल’; पाकिस्तानच्या संघाबाबत मिसबाह उल हकचं मोठं वक्तव्य

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारतासाठी आतापर्यंत ४७ कसोटी, ५४ एकदिवसीय आणि ७२ टी-२० सामने खेळलेला राहुल यशस्वी शस्त्रक्रियेनंतर भारतात परतला आहे. सध्या तो बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (एनसीए) येथे प्रशिक्षण घेत आहे. ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये आशिया कप २०२३ मध्ये राहुलचे पुनरागमन होण्याची अपेक्षा आहे.