भारताच्या बी.अधीबन व कृष्णन शशीकिरण या माजी राष्ट्रीय विजेत्या खेळाडूंनी जागतिक चषक बुद्धिबळ स्पर्धेत दुसऱ्या फेरीकडे वाटचाल केली.अधीबन याने रशियाच्या एवगेनी अलीकसीव्ह याच्यावर ब्लिट्झ डावांद्वारे ५-३ अशी मात केली. शशीकिरण याने रुमानियाच्या कोन्स्टान्टीन लुपुलेस्कु याचा २.५-१.५ अशा गुणांनी पराभव केला. भारताच्या परिमार्जन नेगी याला मात्र पराभवाचा धक्का बसला. युक्रेनच्या युरी क्रिव्होरुचेन्को याने त्याला ४-२ असे पराभूत केले.