VIDEO : अर्ध्या तासात पालटलं नशीब..! रस्त्यावर विकत होता क्रेडिट कार्ड, इतक्यातच मित्र धावत आला अन् म्हणाला…

क्रेडिट कार्ड विकणारा बनला आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू; जीवनाशी संघर्ष करत असाल तर नक्की वाचा!

afghanistan cricketer khyber wali from selling credit cards on road to selection in U19 team
अफगाणिस्तानचा युवा क्रिकेटपटू खैबर वली

अफगाणिस्तानने नुकताच अंडर-१९ आशिया कप आणि अंडर-१९ वर्ल्डकपसाठी आपला संघ निवडला. यामध्ये नांगरहार प्रांतातून येणाऱ्या खैबर वलीचीही निवड करण्यात आली. खैबर वली अतिशय संघर्षमय वातावरणातून समोर आला आहे. तो दिवसा क्रिकेट खेळायचा आणि रात्री रस्त्यावर क्रेडिट कार्ड विकून घर चालवायचा. संघात निवड होईपर्यंत खैबर क्रेडिट कार्ड विकत होता आणि निवडीची बातमी मिळाल्यानंतरही त्याने आपले कार्ड विकण्याचे काम सुरूच ठेवले होते. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने खैबर वलीची कहाणी सांगणारा व्हिडिओ पोस्ट केला आहे.

खैबर वलीने सांगितले, ”मी गेल्या ५-६ वर्षांपासून क्रेडिट कार्ड विकत आहेत. दिवसा क्रिकेट खेळतो आणि रात्री कार्ड विकतो.” खैबर अंडर-१९ संघाची ट्रायल देण्यासाठी गेला होता. तिथे प्रशिक्षकाला त्याची फलंदाजी आवडली आणि त्याने खैबरला शिबिरात समाविष्ट केले. त्याच्या मित्राने त्याला संघातील निवडीची माहिती दिली. यानंतर त्याने आपल्या मित्राला एक कार्ड भेट दिले. त्यांना मिठाईही खाऊ घातली. खैबर त्याला म्हणाला, ”माझ्याकडे सध्या तुला देण्यासाठी एक पैसाही नाही, पण मी तुला हे क्रेडिट कार्ड देईन. यातून तू स्वत: साठी भेटवस्तू घे. तू मला खूप चांगली बातमी दिली आहेस. धन्यवाद माझ्या भावा.”

खैबर ज्या दुकानासमोर क्रेडिट कार्ड विकायचा, त्या दुकानाच्या मालकाला ही बातमी समजली. त्याने खैबरसाठी केक कापून आनंद व्यक्त केला. संघात निवड झाल्याच्या आनंदाबाबत खैबर वलीने सांगितले, ”त्या रात्री मी एकच कार्ड विकू शकलो, पण संघात सामील झाल्याचा आनंद म्हणजे जणू दोन लाख अफगाणी कमावले.” खैबरच्या निवडीची माहिती घरच्यांना कळताच सगळेच भावूक झाले. त्याची आई रडू लागली आणि खैबर आणि त्याच्या भावांनाही आपले अश्रू आवरता आले नाहीत.

हेही वाचा – IND vs SA : दक्षिण आफ्रिकेनं रणशिंग फुंकलं..! भारताला टक्कर देण्यासाठी समोर आणले आपले २१ शिलेदार!

आपल्या धडपडीबद्दल खैबरने सांगितले, ”एकदा रात्री ११ वाजेपर्यंत मी कार्ड विकण्याचा प्रयत्न करत होतो, पण एकही क्रेडिट कार्ड विकले गेले नाही. त्या रात्री मी कमाई केली नाही.” खैबर ज्या अकादमीत खेळायचा तेथील प्रशिक्षक म्हणाले, की तो खूप चांगला क्रिकेटर आहे आणि खूप मेहनत करतो.

”आमचे कुटुंब गरीब आहे आणि प्रत्येकजण किरकोळ काम करून घर चालवतो. खैबरने आठ वर्षांपूर्वी खेळायला सुरुवात केली. मात्र घरची परिस्थिती पाहून तो काम करू लागला. तो दिवसा खेळत राहिला. त्याला दुखापत झाली, की त्याची आई मसाज वगैरे करायची. मी ऑटोमध्ये प्रवासी बसवण्याचे काम करतो. आज खैबरला मिळालेले यश पाहून खूप आनंद मिळाला आहे”, असे खैबरचा भाऊ शाकीरने सांगितले.

अंडर-१९ आशिया चषक, १८ नोव्हेंबर २०२०पासून संयुक्त अरब अमिरातीमध्ये (UAE) सुरू होणार होता परंतु करोना साथीच्या आजारामुळे तो पुढे ढकलण्यात आला. आता स्पर्धेचा नववा हंगाम २० डिसेंबर २०२१ ते ०२ जानेवारी २०२२ दरम्यान यूएईमध्ये खेळवला जाईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Afghanistan cricketer khyber wali from selling credit cards on road to selection in u19 team adn

Next Story
‘हा’ सूर्याचा आतापर्यंतचा सर्वात स्पष्ट फोटो, अमेरिकन ॲस्ट्रोफोटोग्राफरचा दावा; तुम्ही पाहिलात का?
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी