Shubman and Arshdeep video shared by BCCI : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील चौथा सामना शनिवारी पार पडला. हा सामना जिंकत टीम इंडियाने मालिकेत २-२ अशी बरोबर साधली आहे. चौथ्या सामन्यात गोलंदाजीत अर्शदीप सिंग आणि फलंदाजीत यशस्वी जैस्वाल आणि शुबमन गिल यांनी भारताकडून चमकदार कामगिरी केली. आता बीसीसीआयने एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये अर्शदीप सिंग आणि शुबमन गिल बोलताना दिसत आहेत.

या सामन्यात अर्शदीप सिंगने ४ षटकात ३८ धावा देत भारताकडून सर्वाधिक ३ बळी घेतले. त्यानंतर फलंदाजीमध्ये यशस्वी जैस्वालने ११ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने नाबाद ८४ धावा केल्या. त्याचबरोबर शुभमन गिलनेही ४७ चेंडूचा सामना करताना ३ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने ७७ धावांचे योगदान दिले. सामन्यानंतर अर्शदीप सिंग आणि शुबमन गिल यांनी अमेरिकेबद्दल चर्चा केली. चौथा सामना अमेरिकेतील फ्लोरिडा येथे झाला.

शुबमन गिलने पंजाबी भाषेत बोलत व्हिडिओची सुरूवात केली. अर्शदीप सिंगने सर्वप्रथम शुबमन गिलला विकेटबद्दल विचारले. त्यानंतर शुबमन गिलने अर्शदीप सिंगला त्याने पॉवरप्लेमध्ये २ विकेट घेतल्या होत्या, त्याबद्दल बोलायला सांगितले.

अर्शदीप सिंगला विचारताना शुबमन गिल म्हणाला, आज आम्ही पाहिलं की तुझ्या कुटुंबातील सर्व सदस्य आले आहेत, मग त्यांनी आधीच यायचे ठरवले होते का?”यावर अर्शदीप सिंगने उत्तर दिले की, “आधीपासूनची योजना होती. वडील भावासोबत कॅनडाहून इथे आले. ते असे की त्यांच्या बाजूने नेहमीच जास्त प्रोत्साहन मिळत असते.”

हेही वाचा – IND vs WI 4th T20: यशस्वी जैस्वालने शानदार खेळीनंतर हार्दिक पांड्याचे मानले आभार; म्हणाला, ” त्यांनी माझ्यावर…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यानंतर अर्शदीप सिंगने गिलला विचारले की, इशान किशनने सांगितले की, तुला शॉपिंग आणि आर्ट खूप आवडते. गिलने उत्तर दिले, “मला वाटते की तुम्ही जिथे जाल तिथे काहीतरी पाहायला मिळते. कारण प्रत्येक गोष्टीशी खूप इतिहास जोडलेला आहे आणि मला ते पाहायला आवडते. शॉपिंग, जर अमेरिकेत येऊन शॉपिंग नाही केली, तर येऊन काय उपयोग.”