scorecardresearch

Shoaib Malik Tweet: सानिया मिर्झाच्या निवृत्तीनंतर पती शोएब मलिकची भावनिक पोस्ट; म्हणाला, “तू कारकिर्दीत…!”

Shoaib Malik on Sania Mirza: सानिया मिर्झाने शुक्रवारी ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेच्या मिश्र दुहेरीत उपविजेतेपदावर राहून, तिचा साथीदार देशबांधव रोहन बोपण्णासह तिची ग्रँडस्लॅम कारकीर्द संपवली. त्यानंतर शोएब मलिकने एक ट्विट केले आहे. ज्याची सध्या सोशल मीडियावर खूप चर्चा आहे.

Shoaib Malik on Sania Mirza
शोएब मलिक आणि सानिया मिर्झा (फोटो- संग्रहित छायाचित्र जनसत्ता)

भारताची स्टार खेळाडू सानिया मिर्झाने शुक्रवारी ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेच्या मिश्र दुहेरीत उपविजेतेपदावर राहून, तिचा साथीदार देशबांधव रोहन बोपण्णासह तिची ग्रँडस्लॅम कारकीर्द संपवली. सानियाने तिच्या कारकिर्दीत सहा ग्रँड स्लॅम जेतेपदे जिंकली आहेत. ज्यात तीन महिला दुहेरी आणि अनेक मिश्र दुहेरी विजेतेपदांचा समावेश आहे. शोएब मलिकने ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या सानियाबद्दल ट्विट केले, जे सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

शोएबने सानियाचे कौतुक करताना शुभेच्छा दिल्या. त्याने आपल्या ट्विटमध्ये सानियाला तिच्या शानदार कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या आणि लिहिले, ”क्रीडा क्षेत्रातील सर्व महिलांसाठी तू खूप महत्वाची आशा आहेस. तू तुझ्या कारकिर्दीत जे काही मिळवले आहे त्याबद्दल तुझा खूप अभिमान आहे. तू अनेकांसाठी प्रेरणा आहेस, खंबीर राहा. अतुलनीय कारकिर्दीसाठी खूप खूप शुभेच्छा …”

हेही वाचा – IND vs NZ 1st T20: अर्शदीप सिंगचे नो बॉलसोबतचे नाते कधी संपणार? ‘या’ दोन लाजिरवाण्या विक्रमाची केली नोंद

शोएबचे सानियावरील हे ट्विट चांगलेच व्हायरल होत असून चाहतेही त्यावर प्रतिक्रिया देत आहेत. अलिकडच्या काळात शोएब आणि सानिया यांच्या घटस्फोटाच्या बातम्या पसरत आहेत. दोघांनीही याची अधिकृत घोषणा केली नसली, तरी सोशल मीडियावर अशा बातम्या पसरवल्या जात होत्या.

हेही वाचा – Australian Open 2023 : ग्रँडस्लॅमसह निवृत्तीचं सानिया मिर्झाचं स्वप्न भंगलं; मिश्र दुहेरीच्या अंतिम सामन्यात पराभव!

दुसरीकडे फायनलबद्दल बोलायचे झाले, तर सानिया आणि बोपण्णा या बिगरमानांकित जोडीला रॉड लेव्हर एरिना येथे खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात पराभव पत्कारावा लागला. त्यांना लुईसा स्टेफनी आणि राफेल माटोस या ब्राझीलच्या जोडीकडून ६-७ (२) २-६ ने पराभवाचा सामना लागला. त्यानंतर सानिया भावनिक झालेली दिसून आली. त्यानंतर अश्रूदेखील अनावर झाले.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-01-2023 at 10:45 IST
ताज्या बातम्या