मेलबर्न कसोटी सामन्यात भारतीय संघाने पहिल्या डावात ३२६ धावांपर्यंत मजल मारत पहिल्या डावात कांगारुंवर १३१ धावांची आघाडी घेतली. दुसऱ्या दिवसाच्या अखेरीस कर्णधार अजिंक्य रहाणे आणि रविंद्र जाडेजा यांच्या अभेद्य भागीदारीमुळे भारताने सामन्यावर आपलं वर्चस्व निर्माण केलं होतं. रहाणेने दुसऱ्या दिवशी अखेरच्या सत्रातच आपलं शतक पूर्ण केलं. तिसऱ्या दिवशी सुरुवातीच्या सत्रात दोन्ही फलंदाजांनी सावध सुरुवात केली.

अष्टपैलू रविंद्र जाडेजा आपल्या अर्धशतकापासून केवळ एक धाव दूर असताना ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी टिच्चून मारा करत त्याला एक धाव घेताना नाकीनऊ आणले. नॅथन लॉयनच्या गोलंदाजीवर एकेरी धाव घेत असताना संभ्रमामुळे अजिंक्य रहाणे धावबाद झाला. परंतू यानंतरही अजिंक्य रहाणेने निराश न होता जाडेजाला प्रोत्साहन देत माघारी परतण पसंत केलं.

आणखी वाचा- मेलबर्नचं मैदान अजिंक्यने गाजवलं, विराट कोहलीला टाकलं मागे

आणखी वाचा- अजिंक्य रहाणेचं शतक भारतीय क्रिकेटच्या इतिहासातलं सर्वात महत्वपूर्ण – सुनिल गावसकर

अजिंक्य रहाणे माघारी परतल्यानंतर रविंद्र जाडेजाने आपलं अर्धशतक पूर्ण केलं, मात्र यानंतर तो देखील फारकाळ तग धरु शकला नाही. मिचेल स्टार्कने जाडेजाला ५७ धावांवर कमिन्सकरवी झेलबाद केलं.