करोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा सामना करण्यासाठी सध्या जगभरातील क्रिकेट स्पर्धा बंद आहेत. बीसीसीआयनेही आयपीएलचा तेरावा हंगाम पुढील सूचना मिळेपर्यंत स्थगित केला आहे. सध्याच्या लॉकडाउन काळात भारतीय क्रिकेटपटू घरात राहून आपल्या परिवारासोबत वेळ घालवत आहेत. भारतीय कसोटी संघाचा उप-कर्णधार आणि मुंबईकर अजिंक्य रहाणेही सध्या आपल्या घरी पत्नी राधिका आणि मुलगी आर्यासोबत वेळ घालवतो आहे. आर्यासोबत खेळतानाचे फोटो, व्हिडीओ अजिंक्य वारंवार सोशल मीडियावर शेअर करत असतो.

गुरुवारी अजिंक्यने आर्याचा एक खास फोटो सोशल मीडियावर टाकला आहे. २ आठवड्यांच्या आर्याला घेतानाचा आणि ८ महिन्यांच्या आर्याला कडेवर घेतानाचा फोटो पोस्ट करत अजिंक्यने, आर्या किती वेगळी दिसायला लागली आहे अशी कॅप्शन टाकली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सध्या सर्व क्रिकेट सामने बंद असल्यामुळे बहुतांश क्रिकेट बोर्डांना आर्थिक नुकसान होत आहे. आयपीएल स्पर्धा रद्द झाल्यास बीसीसीआयला ४ हजार कोटींचं नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वर्षाअखेरीस स्पर्धेचं आयोजन करता येतं का याची चाचपणी बीसीसीआय करत आहे. तेराव्या हंगामात अजिंक्य आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळणार आहे.