ठाण्याचा अमन फारूख संजय, नागपूरचा रोहन गुरबनी, पुण्याची पूर्वा बर्वे, मुंबई उपनगरची सिमरन सिंघी यांनी यांनी येथे जिल्हा बॅडमिंटन संघटनेतर्फे आयोजित राज्यस्तरीय कनिष्ठ स्पर्धेत आपआपल्या गटात दुहेरी मुकूट मिळविला. १० वर्षांआतील गटात यजमान नाशिकच्या प्रज्वल सोनवणेने विजेतेपद मिळविले.
येथील विभागीय क्रीडा संकुलात आयोजित स्पर्धेचा रविवारी समारोप झाला. प्रत्येक गटातील अंतिम सामने असल्याने क्रीडाप्रेमींनी बऱ्यापैकी गर्दी केली होती.
राष्ट्रीय विजेत्या पूर्वा बर्वेने नागपूरच्या राशी लांबेचा पहिला सेट २५-२७ असा गमावला असतानाही पुढील दोन सेट २१-१३,२१-१२ असे जिंकत पराभव केला. अमन फारूख संजयने ठाण्याच्याच वंश सिंगवर २१-९,२१-१३ अशी आरामात मात केली. मुलींच्या १३ वर्षांआतील गटात मुंबई उपनगरच्या सिमरन सिंघीने नाशिकच्या सई नांदुरकरवर सरळ दोन सेटमध्ये २१-१५,२१-१७ अशी मात करून आपले वर्चस्व कायम राखले. मुलांमध्ये नागपूरच्या व्दितीय मानांकित रोहन गुरबनीने मुंबई उपनगरच्या प्रथम मानांकित वरूण दवेचा कडवा प्रतिकार २१-१९,२१-१८ असा मोडून काढला.
संग्रहित लेख, दिनांक 30th Jun 2014 रोजी प्रकाशित
अमन, रोहन, पूर्वा, सिमरन यांना दुहेरी मुकूट
ठाण्याचा अमन फारूख संजय, नागपूरचा रोहन गुरबनी, पुण्याची पूर्वा बर्वे, मुंबई उपनगरची सिमरन सिंघी यांनी यांनी येथे जिल्हा बॅडमिंटन संघटनेतर्फे आयोजित राज्यस्तरीय कनिष्ठ स्पर्धेत आपआपल्या गटात दुहेरी मुकूट मिळविला.
First published on: 30-06-2014 at 01:08 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aman rohan purva simran win doubles badminton