ऑस्ट्रेलियाच्या भारत दौऱ्यावरील नाटय़मय घटनांमध्ये आणखी एक वळण मिळाले आहे. तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी चार खेळाडूंना वगळल्याचा निर्णय जाहीर झाल्यानंतर तासाभरातच ऑस्ट्रेलियाचा उपकर्णधार शेन वॉटसन मायदेशी निघाला आहे. त्यामुळे संघात बंडाचे निशान पुकारण्यात आल्याची चर्चा जोरात सुरू आहे.
सोमवारी या नाटय़मय घडामोडी घडल्यानंतर उर्वरित संघाचा सराव सुरू होता. परंतु वॉटसनने संघाचे निवासस्थान असलेले हॉटेल सोडले असून, तो सिडनीकडे रवाना झाला आहे. त्यामुळे चार खेळाडूंची हकालपट्टी झाल्यानंतर संघातील वातावरण कमालीचे संतप्त झाले असल्याचेच स्पष्ट होत आहे.
तथापि, शिस्तीच्या शिक्षेमुळे वॉटसन याने मायदेशाचा रस्ता धरला असल्याचे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने मात्र अमान्य केले. वॉटसनची पत्नी ली फरलाँग गर्भवती असून, त्यांच्या पहिल्या अपत्यासाठी तो ऑस्ट्रेलियात परतला आहे, असे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने स्पष्ट केले आहे. वॉटसनला यासाठी घरी परतता येईल, अशी मुभा आधीच देण्यात आलेली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 12th Mar 2013 रोजी प्रकाशित
संतप्त शेन वॉटसन मायदेशाकडे रवाना
ऑस्ट्रेलियाच्या भारत दौऱ्यावरील नाटय़मय घटनांमध्ये आणखी एक वळण मिळाले आहे. तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी चार खेळाडूंना वगळल्याचा निर्णय जाहीर झाल्यानंतर तासाभरातच ऑस्ट्रेलियाचा उपकर्णधार शेन वॉटसन मायदेशी निघाला आहे.

First published on: 12-03-2013 at 03:34 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Angry shane watson go back to home