मोनॅको : भारताच्या माजी लांबउडीपटू अंजू बॉबी जॉर्ज यांची जागतिक अ‍ॅथलेटिक्स संघटनेकडून वर्षांतील सर्वोत्कृष्ट महिला या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. देशभरात युवा पिढीला घडवण्याबरोबरच लिंग समानतेसाठी सातत्याने पुढाकार घेतल्याने ४४ वर्षीय अंजू यांना २०२१ या वर्षांतील सर्वोत्तम महिलेचा बहुमान मिळाला आहे.

अंजू यांनी २००३ मध्ये झालेल्या जागतिक अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत ऐतिहासिक कांस्यपदकाची कमाई केली होती. जागतिक स्पर्धेत पदक जिंकणाऱ्या त्या अद्यापही भारताच्या एकमेव अ‍ॅथलेटिक्सपटू आहेत. बुधवारी युरोपमधील मोनॅको शहरात झालेल्या आभासी पुरस्कार वितरण सोहळय़ात अंजू यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. अ‍ॅथलेटिक्ससाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या महिलांचा हा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो.

gukesh d creates history becomes youngest Player to win fide candidates title zws
गुकेशला ऐतिहासिक जेतेपद; नामांकितांना मागे सोडत ‘कँडिडेट्स’मध्ये अजिंक्य; जगज्जेतेपदाच्या लढतीसाठी पात्र
Mr. Gay Nepal 2024
‘मिस्टर गे नेपाळ २०२४’ चा किताब लक्ष्मण मगर यांनी जिंकला; आता लंडनमध्ये करणार प्रतिनिधित्व
Cash prize from Paris Olympics to gold medal winning athletes
सुवर्णपदकविजेत्या अ‍ॅथलेटिक्सपटूंना पॅरिस ऑलिम्पिकपासून रोख पारितोषिक! जागतिक अ‍ॅथलेटिक्स संघटनेचा निर्णय
national boxing championship marathi news
नागपूरच्या समीक्षा, अनंतने जिंकले राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक

‘‘जागतिक अ‍ॅथलेटिक्स संघटनेने मला या पुरस्कारासाठी पात्र समजल्याने मी त्यांचे आभार मानते. ज्या क्षेत्राने आपली ओळख निर्माण केली. त्यासाठी योगदान देण्याचा आनंद निराळाच आहे. माझ्या कार्याची दखल घेऊन अनेक युवा मुलींना प्रेरणा दिल्याबद्दल धन्यवाद,’’ असे ‘ट्वीट’ अंजू यांनी केले. अंजू यांची गतवर्षी भारतीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाच्या वरिष्ठ उपाध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली. २०१६ मध्ये त्यांनी अ‍ॅथलेटिक्सच्या अकादमीची स्थापना केली. काही महिन्यांपूर्वीच झालेल्या २० वर्षांखालील मुला-मुलींच्या जागतिक स्पर्धेत अंजू याची शिष्य शैली सिंगने रौप्यपदकावर नाव कोरले होते. अंजू यांच्या कार्यामुळे भारतीय महिलांचे नवे प्रतीक उदयास आले आहे, असे मत केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी व्यक्त केले.