सनसनाटी विजयाची मालिका कायम ठेवीत अंकिता रैना या भारताच्या खेळाडूने एनईसीसी करंडक महिलांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत अंतिम फेरी गाठली. तिला आता इंग्लंडच्या कॅटी डय़ुन्नी हिच्या आव्हानास सामोरे जावे लागेल. दुहेरीत अॅना मॉर्गिना (रशिाय) व निना स्टोजानोविक (सर्बिया) यांना विजेतेपद मिळाले.
चौथ्या मानांकित अंकिता हिने रुमानियाच्या क्रिस्तिना अॅनी हिला ६-१, ३-६, ६-३ असे पराभूत केले. अन्य लढतीत कॅटी हिने जॉर्जियाच्या सोफिया शातापावा या तृतीय मानांकित खेळाडूचे आव्हान ६-१, ६-२ असे संपुष्टात आणले. अंतिम सामना शनिवारी सकाळी १० वाजता होणार आहे.
अंकिता हिला क्रिस्तिना हिच्याविरुद्ध विजय मिळविताना झगडावे लागले. तिने फोरहँडच्या फटक्यांचा बहारदार खेळ करीत पहिल्या सेटमध्ये दोन वेळा सव्र्हिसब्रेक मिळविला. दुसऱ्या सेटमध्ये अंकिता हिला स्वत:च्या खेळावर नियंत्रण ठेवता आले नाही. त्याचा फायदा घेत क्रिस्तिना हिने दोन वेळा सव्र्हिसब्रेक मिळविला. तिने पासिंग शॉट्सचा सुरेख खेळ केला. तिने हा सेट घेतल्यामुळे सामन्यात १-१ अशी बरोबरी झाली. साहजिकच तिसऱ्या सेटविषयी कमालीची उत्सुकता निर्माण झाली. हा सेट सव्र्हिसब्रेकमुळे अधिक रंगतदार झाला. अंकिता हिने चार वेळा सव्र्हिसब्रेक मिळविला तर दोन वेळा तिला सव्र्हिस गमवावी लागली.
संग्रहित लेख, दिनांक 27th Dec 2014 रोजी प्रकाशित
अंकिता रैनाची अंतिम फेरीत धडक
सनसनाटी विजयाची मालिका कायम ठेवीत अंकिता रैना या भारताच्या खेळाडूने एनईसीसी करंडक महिलांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत अंतिम फेरी गाठली.

First published on: 27-12-2014 at 05:17 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ankita raina downs romanian qualifier to enter necc itf final