वरळी येथे सुरू असलेल्या कॅप्टन एस. जे. इझीकेल स्मृती राज्य नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेचा तिसरा दिवस गाजवला कोल्हापूरच्या अनुष्का पाटीलने. एअर पिस्तूल प्रकारात अनुष्काने तीन सुवर्णपदकांवर नाव कोरले. महिलांमध्ये अनुष्काने ४०० पैकी ३७२ गुणांची कमाई करत अव्वल स्थान पटकावले. वर्षां टंकने ३५५ गुणांसह रौप्य तर अभिज्ञा पाटीलने कांस्यपदक पटकावले. कनिष्ठ गटातून खेळताना अनुष्काने पुन्हा एकदा ३७२ गुणांसह पहिला क्रमांक पटकावला. अभिज्ञा पाटीलने रौप्य तर कस्तुरी गोरेने कांस्यपदकाची कमाई केली. युवा गटामध्येही अनुष्काने ३७२ गुणच कायम राखत प्रथम क्रमांकाचा मान पटकावला. आर्या जाधवने रौप्य तर अभिज्ञा पाटीलने कांस्यपदक मिळवले. एअर पिस्तूल प्रकारात पुरुषांमध्ये संजय राऊतने ३६१ गुणांसह अव्वल स्थान पटकावले. योगेश चौधरीने रौप्य तर विशाल तोरसकरने कांस्यपदक मिळवले. कनिष्ठ गटात आकाश भंडावळेने ३६१ गुणांसह सुवर्णपदकावर नाव कोरले. यश साळोखेने रौप्य तर राजवर्धन पाटीलने कांस्यपदक पटकावले. युवा गटात प्रशांत कुलकर्णी ३५५ गुणांसह सुवर्णपदकाचा मानकरी ठरला.
संग्रहित लेख, दिनांक 22nd Apr 2015 रोजी प्रकाशित
कोल्हापूरच्या अनुष्का पाटीलची सुवर्णपदकांची हॅट्ट्रिक
वरळी येथे सुरू असलेल्या कॅप्टन एस. जे. इझीकेल स्मृती राज्य नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेचा तिसरा दिवस गाजवला कोल्हापूरच्या अनुष्का पाटीलने.
First published on: 22-04-2015 at 12:01 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anushka patil of kolhapur make hat trick of gold medals