अ‍ॅशेस मालिकेत जो रूटच्या नेतृत्वाखालील इंग्लंड संघ आधीच ०-१ने पिछाडीवर आहे. दुसऱ्या कसोटीतही त्यांची सुरुवात अपेक्षेप्रमाणे झाली नाही. दरम्यान, आयसीसीने जो रूटच्या संघाला दोन मोठे झटके दिले आहेत. आयसीसीने इंग्लंडला पाच नव्हे, तर आठ गुणांचा दंड ठोठावला आहे. खरे तर, ब्रिस्बेनमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात स्लो ओव्हर रेटसाठी इंग्लंडला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (WTC) पाच नव्हे, तर आता आठ गुणांचा दंड ठोठावण्यात आला आहे. पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडला पराभवाचा सामना करावा लागला होता.

आयसीसीने यापूर्वी जाहीर केले होते, की इंग्लंड संघाला त्यांच्या मॅच फीच्या १०० टक्के दंड आणि पाच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुण वजा केले जातील. इंग्लंडने नियोजित वेळेपेक्षा आठ षटके कमी टाकली होती (आधी जाहीर केल्याप्रमाणे पाच षटके नव्हती.) यामुळे तीन अतिरिक्त गुण वजा करण्यात आले. आयसीसीने सांगितले, लहान षटकांच्या संख्येनुसार प्रति षटक एक गुण दंड आकारण्यात आला. इंग्लंड संघाने आतापर्यंत पाच कसोटी सामने खेळले असून त्यांचे सहा गुण झाले आहेत.

हेही वाचा – VIDEO : भयानक रे बाबा..! अ‍ॅशेसचा कसोटी सामना सुरू असताना अचानक पडली वीज अन्…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कसोटी चॅम्पियनशिपचा विजेतेपद सामना खेळण्यासाठी गुणतालिकेत पहिल्या दोन स्थानांवर असणे आवश्यक आहे, परंतु पाच कसोटीनंतर गुणतालिकेत इंग्लंडची स्थिती वाईट आहे. ते सध्या सातव्या व्या स्थानावर आहे. संघाला केवळ गुणांसाठी दंडच नाही, तर संपूर्ण सामन्याची फीसुद्धा कापण्यात आली. आयसीसीच्या नियमांनुसार, निर्धारित वेळेत टाकलेल्या षटकांच्या संख्येनुसार सामन्याचे शुल्क कापले जाते. एका षटकासाठी २० टक्के सामना शुल्क कापले जाते, परंतु दंड १०० टक्क्यांपेक्षा जास्त असू शकत नाही.