After India vs Pakistan match Irfan Pathan’s tweet went viral: आशिया कपमध्ये टीम इंडियाच्या मोहिमेची सुरुवात चांगली झाली नाही. शनिवारी भारताचा पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध होता, मात्र हा हाय व्होल्टेज सामना पावसामुळे रद्द झाला. ४८.५ षटकांत फलंदाजी करताना भारताने पाकिस्तानला २६७ धावांचे लक्ष्य दिले होते, मात्र दुसऱ्या डावात एकही चेंडू टाकता आला नाही. सामना रद्द झाल्याचा फायदा पाकिस्तानला मिळाला. कारण पाकिस्तानने ३ गुणांसह थेट सुपर -4 मध्ये प्रवेश केला आहे. या सामन्यानंतर भारताचा माजी क्रिकेटपटू इरफान पठाणचे एक ट्विट व्हायरल होत आहे.

इरफान पठाणच्या ट्विटने पेटले रान –

हा शानदार सामना रद्द झाल्याबद्दल दोन्ही देशांच्या क्रिकेट चाहत्यांनाच दु:ख झाले नाही, तर दोन्ही संघातील अनेक दिग्गज खेळाडूंही निराश झाले, पण सामना अनिर्णित राहिल्यानंतर भारताचा माजी गोलंदाज इरफान पठाणने पाकिस्तानला मजेशीर चिमटा काढला. वास्तविक पठाणने एक ट्विट केले, ज्यामुळे सोशल मीडियावर नवीन युद्ध सुरू झाले. पठाणने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे “आज अनेक शेजाऱ्यांचे टीव्ही वाचले आहेत.” पठाणचे हे ट्विट पाकिस्तानला टोमणे मारणारे होते.

इरफान पठाणच्या ट्विटने पाकिस्तानी चाहते नाराज –

इरफानच्या या ट्विटनंतर सोशल मीडियावर नवे युद्ध सुरू झाले. सामना झाला असता, तर पाकिस्तान संघाचा पराभव झाला असता. अशा दाव्याने पठाण कसे म्हणाले, यावरून आता लढत आहे. पठाणच्या या ट्विटवर पाकिस्तानी चाहत्यांकडूनही मजेशीर कमेंट येऊ लागल्या. पठाणच्या ट्विटने भारतीय चाहत्यांची मने जिंकली. पठाणच्या ट्विटवर कमेंट करताना एका पाकिस्तानी चाहत्याने लिहिले, तुम्ही स्वतःला जोकर म्हणून सिद्ध करण्याची संधी कधीही सोडू शकत नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारताने ४९ षटके फलंदाजी केली –

सामन्याबद्दल बोलायचे झाले, तर भारताचा पहिला सामना पाकिस्तानशी झाला होता. भारताने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. भारताने पाकिस्तानला २६७ धावांचे लक्ष्य दिले होते. भारतीय संघाला ४८.५ षटकांत २६६ धावा करता आल्या. भारताकडून इशान किशन (८२) आणि हार्दिक पांड्या (८७) यांनी सर्वाधिक धावा केल्या. तर शाहीन आफ्रिदीने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या.