Mohammad Nabi 5 Sixes: आशिया चषक २०२५ स्पर्धेत गुरुवारी झालेल्या सामन्यात अफगाणिस्तान आणि श्रीलंका हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात अफगाणिस्तानचा अष्टपैलू खेळाडू मोहम्मद नबीच्या फलंदाजीचा जोर पाहायला मिळाला. अफगाणिस्तानचा संघ या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला होता. प्रथम फलंदाजी करताना मोहम्मद नबीने पहिल्या डावातील शेवटच्या षटकात षटकारांचा पाऊस पाडला. त्याच्याकडे सलग ६ चेंडूत ६ षटकार मारण्याची संधी होती. पण ही संधी थोडक्यात हुकली. त्याने सुरुवातीच्या ५ चेंडूंवर सलग ५ षटकार खेचले.
श्रीलंकेविरुद्ध झालेल्या सामन्यात अफगाणिस्तानच्या इतर फलंदाजांची बॅट शांत राहिली. पण मोहम्मद नबीची बॅट चांगलीच तळपली. त्याने अवघ्या २२ चेंडूत ६० धावा चोपल्या. यादरम्यान त्याने ३ चौकार आणि ६ षटकार मारले. या ६ पैकी ५ षटकार त्याने लागोपाठ मारले. या खेळीच्या बळावर अफगाणिस्तानने २० षटकांअखेर ८ गडी बाद १६९ धावा केल्या.
टी -२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकाच षटकात सलग ६ षटकार मारण्याचा विक्रम हा भारताच्या युवराज सिंगच्या नावावर आहे. युवराजने आजच्याच दिवशी म्हणजे १९ सप्टेंबर २००७ ला इंग्लंडविरुद्ध खेळताना सलग ६ षटकार मारले होते. आयसीसी टी -२० वर्ल्डकप स्पर्धेत इंग्लंडविरुद्ध खेळताना स्टुअर्ट ब्रॉडच्या षटकात त्याने हा पराक्रम केला होता. युवराज सिंगनंतर अनेक फलंदाजांनी हा विक्रम आपल्या नावावर केला. ज्यात कायरन पोलार्ड आणि मनन बशीरसारख्या खेळाडूंचा समावेश आहे.
श्रीलंकेचा दमदार विजय
या सामन्यात अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानकडून फलंदाजी करताना मोहम्मद नबीने ६० धावांची खेळी केली. तर राशिद खानने २४ धावा केल्या. इब्राहिम जदरानने २४ धावांची खेळी केली. या खेळीच्या बळावर अफगाणिस्तानने २० षटकांअखेर ८ गडी बाद १६९ धावा केल्या. श्रीलंकेला हा सामना जिंकण्यासाठी १७० धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेकडून कुसल मेंडिसने नाबाद ७४ धावांची खेळी केली. तर कुसल परेराने २८ धावांची खेळी केली. या खेळीच्या बळावर त्याने श्रीलंकेला ६ गडी राखून विजय मिळवून दिला. यासह सुप