Shahid Afridi On Asia Cup Controversy: आगामी आशिया चषक स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानकडून हिरावले जाणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) पाकिस्तानमध्ये खेळण्यास नकार दिला आहे. तसेच यावेळी आशिया चषक तटस्थ मैदानावर खेळवला जाईल, असे आशियाई क्रिकेट परिषदेचे (एसीसी) अध्यक्ष जय शाह यांनी सांगितले होते. याबाबत पाकिस्तान नाराज आहे. पुढील महिन्यात याबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. त्याआधी पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने मोठे वक्तव्य केले आहे.

पाकिस्तानच्या काही माजी खेळाडू आणि क्रिकेट तज्ज्ञांनी पाकिस्तान क्रिकेट बोर्ड अर्थात पीसीबीने याप्रकरणी आयसीसीकडे जावे, असे म्हटले आहे. आयसीसीने या प्रकरणी काहीतरी केले पाहिजे. आता बीसीसीआयसमोर आयसीसीही काही करू शकणार नाही, असे आफ्रिदीने म्हटले आहे. आफ्रिदीने ‘समा टीव्ही’ला सांगितले की, “भारत आशिया चषकसाठी पाकिस्तानचा दौरा करणार का?” भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकावर आम्ही बहिष्कार टाकणार का? मला याबद्दल काहीही माहिती नाही, परंतु आपण कधी ना कधी भूमिका घेणे आवश्यक आहे.”

hitler swastika banned in switzerland
स्वस्तिकचा हिटलरशी संबंध कसा आला? स्वित्झर्लंडला या चिन्हावर बंदी का आणायची आहे?
Saudi Arabia and india
काश्मीरच्या समस्येवर सौदी अरेबियानं स्पष्ट केली भूमिका, दिली भारताला साथ
What is the controversy over the ban fast in Ramadan on footballers in France
रमजानमध्ये उपवास करता येणार नाही? फ्रान्समध्ये फुटबॉलपटूंवरील मनाईचा वाद काय?
japan, a peaceful country, export weapons of mass destruction
विश्लेषण: शांत, युद्धविरोधी जपानकडून विध्वंसक शस्त्रे निर्यात पुन्हा का सुरू होतेय?

हेही वाचा: Ravindra Jadeja: फुकरे लोकांवर काढली भडास! जडेजाला ‘सर’ नावाने बोलावल्याचा येतो राग म्हणाला, “त्यापेक्षा ‘हे’ नाव जास्त जवळचे”

काय म्हणाला आफ्रिदी?

आफ्रिदी पुढे म्हणाला, “या प्रकरणात आयसीसीची भूमिका महत्त्वाची ठरते. त्यांनी पुढे यावे, पण मी इतके सांगू शकतो की बीसीसीआयसमोर आयसीसीही काही करू शकत नाही. बीसीसीआय हे करू शकते, कारण बीसीसीआयने स्वत:ला खूप मजबूत बनवले आहे,” असे आफ्रिदी म्हणाला.

पीसीबीवर ताशेरे ओढताना शाहिद आफ्रिदी पुढे म्हणाला, “जर एखाद्याला त्याच्या पायावर उभे राहता येत नसेल तर त्याच्यासाठी इतका कठोर निर्णय घेणे सोपे नसते. त्याला अनेक गोष्टी पाहायच्या असतात. भारत जर डोळे दाखवत असेल तर त्यामागचे कारण हेच आहे की, त्याने स्वत:ला इतके मजबूत बनवले आहे.”

हेही वाचा: ICC Apologies:  अवघ्या ६ तासात टीम इंडियाला नंबर-१ वरून हटवले, ICCवर आली जाहीर माफी मागण्याची नामुष्की

मियाँदादनेही वादग्रस्त विधान केले होते

आशिया चषकाच्या मुद्द्यावर पाकिस्तानचे माजी कर्णधार आणि प्रशिक्षक जावेद मियाँदाद म्हणाले होते, “मी आधीही म्हणायचे, जर तू आला नाहीस तर नरकात जा.” आम्हाला काही फरक पडत नाही.” मियाँदादने नंतर त्यांच्या विधानावर स्पष्टीकरण दिले. त्याचा अर्थ चुकीचा काढण्यात आल्याचे मियाँदाद म्हणाले. तो म्हणाला, “तुला माहित आहे याचा अर्थ काय? इथे खेळायचे नसेल तर खेळू नका. आम्हाला यात कोणतीही अडचण नाही. या मुद्द्यावर तुम्ही दोन्ही देशांच्या खेळाडूंना विचारले तर ते म्हणतील की दोन्ही संघांमध्ये सामना व्हायला हवा. त्याचा फायदा दोन्ही देशांना होईल.

मियाँदाद पुढे म्हणाला होता, “जर भारताला वाटत असेल की पाकिस्तानात न आल्याने काही फरक पडेल, तर तसे अजिबात नाही. पाकिस्तानने क्रिकेटपासून हॉकीपर्यंत अनेक दिग्गज खेळाडू दिले आहेत. जगभरातील शेजारी एकमेकांशी खेळतात.