India Playing 11 Announced for IND vs UAE Asia Cup 2025 Match: भारतीय संघ आशिया चषक २०२५ स्पर्धेतील आपल्या मोहिमेला आज १० सप्टेंबरला युएईविरूद्ध सामन्याने सुरूवात करत आहे. दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर हा सामना खेळवला जात आहे. भारताचे नेतृत्त्व सूर्यकुमार यादवच्या खांद्यावर आहे. तर मोहम्मद वसीम युएई संघाचा कर्णधार आहे. या सामन्याची नाणेफेक भारतीय संघाने जिंकली असून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. आशिया चषकातील पहिल्याच सामन्यात भारताची प्लेईंग इलेव्हन कशी असणार यावर सर्वांच्या नजरा आहेत.
बीसीसीआयने कर्णधार सूर्यकुमार यादवच्या नेतृत्त्वाखाली १५ सदस्यीय संघाची घोषणा करण्यात आली. शुबमन गिलच्या खांद्यावर या टी-२० संघाची उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. त्यामुळे भारताकडून सलामीला उतरणारा संजू सॅमसन खेळणार की नाही याबाबत चाहत्यांना मोठा प्रश्न पडला आहे. गिल टी-२० संघात परतल्याने अभिषेक शर्मासह तो डावाची सुरूवात करताना दिसण्याची शक्यता आहे. याचबरोबर जसप्रीत बुमराहला युएईविरूद्ध सामन्यात खेळवणार का यावरही सर्वांच्या नजरा आहेत.
युएईविरूद्ध सामन्यासाठी भारताच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये कोणाला मिळाली संधी?
टी-२० मधील जगातील पहिल्या क्रमांकाचा फलंदाज असलेल्या अभिषेक शर्मासह शुबमन गिल सलामीला उतरणार आहे. तिसऱ्या क्रमांकावर सूर्यकुमार यादव खेळताना दिसेल. तर चौथ्या क्रमाकांवर तिलक वर्मा फलंदाजीला उतरेल. तर यष्टीरक्षक म्हणून संजू सॅमसनला अखेर संधी देण्यात आली आहे. त्यानंतर अष्टपैलू खेळाडूंमध्ये हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल खेळताना दिसतील. गोलंदाजीत जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, वरूण चक्रवर्ती असणार आहेत. यासह भारतीय संघ ३ फिरकीपटूंसाठी उतरला आहे.
IND vs UAE: भारताची प्लेईंग इलेव्हन
अभिषेक शर्मा, शुबमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शिवम दुबे, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, वरूण चक्रवर्ती
IND vs UAE: युएईची प्लेईंग इलेव्हन
मुहम्मद वसीम (कर्णधार), अलिशान शराफू, मुहम्मद जोहैब, राहुल चोप्रा (यष्टीरक्षक), आसिफ खान, हर्षित कौशिक, हैदर अली, ध्रुव पराशर, मुहम्मद रोहिद खान, जुनैद सिद्दिकी, सिमरनजीत सिंग