scorecardresearch

Premium

Asian Games 2018 : ८०० मी. शर्यतीत मनजीत सिंहला सुवर्णपदक, जिनसन जॉन्सनला रौप्य

दहाव्या दिवसाच्या खेळाचे लाईव्ह अपडेट्स

सुवर्णपदक विजेता मनजीत सिंह
सुवर्णपदक विजेता मनजीत सिंह

आशियाई क्रीडा स्पर्धेच्या दहाव्या दिवशी पुन्हा एकदा अॅथलेटिक्सने भारताला सुवर्णपदकाची कमाई करुन दिली आहे. मनजीत सिंह आणि जिनसन जॉन्सन यांनी अनुक्रमे सुवर्ण आणि रौप्य पदकाची कमाई केली. मनजीतने १:४६:१५, तर जिनसनने १:४६:३५ अशी वेळ नोंदवली. सुरुवातीला अतिशय सावधपणे सुरुवात केलेल्या दोन्ही भारतीयांनी मोक्याच्या क्षणी वेग घेत आपल्या प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकलं.

त्याआधी सकाळच्या सत्रात भारताच्या पुरुष तिरंदाजी संघाने रौप्यपदकाची कमाई केली आहे. अटीतटीच्या लढतीत शूटऑफमध्ये कोरियाच्या संघाने भारतीय संघावर मात करत विजेतेपद पटकावलं. भारतीय संघाचं हे तिरंदाजीमधलं दुसरं रौप्यपदक ठरलं आहे. शूटऑफमध्ये दोन्ही संघाचे गुण हे समसमान झाले होते. मात्र कोरियाच्या खेळाडूंनी लक्ष्याच्या जवळ अधिक मारा केल्यामुळे त्यांना या स्पर्धेचं विजेतेपद देण्यात आलं. यासोबत कुराश प्रकारात भारताच्या भारताच्या मालप्रभा जाधवला कांस्य तर पिनाकी बलहाराला रौप्यपदक मिळालं.

तत्पूर्वी भारताच्या महिलांना सांघिक तिरंदाजी प्रकारात रौप्यपदकावर समाधान मानावं लागलं.  २३१-२२८ च्या फरकाने भारतीय महिलांना हा सामना गमवावा लागला. दोन्ही संघांमधला अंतिम सामना हा अतिशय अटीतटीचा झाला. मात्र मोक्याच्या क्षणी १० गुणांची कमाई करण्यात भारतीय महिला अपयशी ठरल्या. याचा फायदा घेत कोरियन महिलांनी सुवर्णपदकावर आपलं नावं कोरलं. दुसरीकडे भारताच्या टेबल टेनिस संघाला कांस्यपदकावर समाधान मानावं लागलं आहे. उपांत्य फेरीत भारताला दक्षिण कोरियाकडून ०-३ ने हार पत्करावी लागली.

Live Blog

22:25 (IST)28 Aug 2018
घोडेस्वारी सांघिक

दिवसाअखेर भारतीय पथकाला रौप्यपदक

19:25 (IST)28 Aug 2018
मिश्र रिले ४ बाय ४००

भारताच्या खात्यात आणखी एका पदकाची भर. ४ बाय ४०० च्या रिलेमध्ये भारताला रौप्य पदक मिळाले.  

18:39 (IST)28 Aug 2018
कुराश – महिला (५२ किलो वजनी गट)

अंतिम फेरीत पिनाकी बलहारा पराभूत, भारताच्या खात्यात आणखी एक रौप्यपदक

18:28 (IST)28 Aug 2018
अॅथलेटिक्स – ८०० मी. शर्यत

भारतीय धावपटूंचा डंका, मनजीत सिंहला सुवर्ण तर जिनसन जॉन्सनला रौप्यपदक. दहाव्या दिवसातलं भारताचं पहिलं सुवर्णपदक

17:58 (IST)28 Aug 2018
कुराश – महिला ५२ किलो वजनी गट

मालप्रभा जाधवला कांस्यपदक, भारताच्या खात्यात आणखी एका पदकाची भर

दुसरीकडे  पिनाकी बलहारा अंतिम फेरीत दाखल, भारताचं एक रौप्यपदक निश्चीत 

17:35 (IST)28 Aug 2018
अॅथलेटिक्स – २०० मी शर्यत

अतिघाईमुळे सुरुवात चुकल्यामुळे हिमा दास शर्यतीमधून बाहेर, भारताचं एक पदक हुकलं

16:43 (IST)28 Aug 2018
स्क्वॉश – पुरुष

भारतीय संघाची कतार २-१ ने मात, बुधवारी भारताचा थायलंडशी सामना

16:38 (IST)28 Aug 2018
कुराश – महिला ५२ किलो वजनी गट

भारताचं एक पदक निश्चीत, मलप्रभा जाधव उपांत्य फेरीत दाखल

पिनाकी बलहारा उपांत्य फेरीत, भारताचं आणखी एक पदक निश्चीत

16:35 (IST)28 Aug 2018
हॉकी – पुरुष

भारताची श्रीलंकेवर २०-० ने मात

14:35 (IST)28 Aug 2018
Sepak Takraw

जपानची भारतावर २-० ने मात

14:33 (IST)28 Aug 2018
बॉक्सिंग – महिला

५७ किलो वजनी गटात भारताची सोनिया पराभूत

दुसऱ्या वजनी गट स्पर्धेत इंडोनेशियाच्या प्रतिस्पर्ध्याची भारताची पवित्रावर ३-२ ने मात 

14:30 (IST)28 Aug 2018
व्हॉलिबॉल – पुरुष

पिछाडी भरुन काढत पाकिस्तानची भारतावर ३-१ ने मात. 

14:00 (IST)28 Aug 2018
तिरंदाजी – पुरुष सांघिक

महिलांपाठोपाठ पुरुष संघालाही रौप्यपदकावर समाधान. अंतिम फेरीत कोरियाची भारतावर शूटआऊटने मात

13:52 (IST)28 Aug 2018
बॅडमिंटन – महिला एकेरी

भारताच्या पी. व्ही. सिंधूला रौप्यपदक, अंतिम फेरीत चीन तैपेईच्या प्रतिस्पर्धी खेळाडूकडून भारत१३-२१, १६-२१ अशी मात केली आहे.

13:29 (IST)28 Aug 2018
टेबल टेनिस – पुरुष सांघिक

भारतीय संघाला कांस्यपदक, उपांत्य फेरीत दक्षिण कोरियाकडून भारत ०-३ ने पराभूत. एशियाडमध्ये टेबल टेनिसमधलं भारताचं पहिलं पदकं

11:40 (IST)28 Aug 2018
तिरंदाजी – महिला सांघिक

भारतीय संघाला रौप्यपदक. अंतिम फेरीत कोरियाची भारतावर २३१-२२८ ने मात

10:27 (IST)28 Aug 2018
घोडेस्वारी

भारतीय संघ पात्रता फेरीमधून बाहेर

10:14 (IST)28 Aug 2018
स्क्वॉश – महिला

भारतीय महिलांची थायलंडवर ३-० ने मात, पुढची लढत इंडोनेशियाविरुद्ध

10:13 (IST)28 Aug 2018
सायकलिंग – महिला

मनोरमा देवी, नयना राजेश प्रियदर्शनी, चाओबा देवी, मेघा शिवानिंग अंतिम फेरी गाठण्यात अयशस्वी

09:15 (IST)28 Aug 2018
अॅथलेटिक्स – (महिला) २०० मी. धावणे

भारताची द्युती चंद उपांत्य फेरीत दाखल 

द्युतीसोबत हिमा दासही उपांत्य फेरीमध्ये

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Asian games 2018 indonesia day 10 live updates

First published on: 28-08-2018 at 07:53 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×