Asian Games 2023, Avinash Sabale: भारताचा स्टार अ‍ॅथलीट अविनाश साबळे याने आशियाई क्रीडा स्पर्धा २०२३ मध्ये सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला आहे. अविनाशने ३००० मीटर स्टीपलचेस अंतिम फेरीत प्रथम क्रमांक मिळवून सुवर्णपदक जिंकले. आशियाई क्रीडा २०२३ मधील अॅथलेटिक्समधील भारताचे हे पहिले सुवर्णपदक आहे. त्याने ८:१९:५०च्या वेळेसह प्रथम स्थान मिळविले.

महाराष्ट्राचे नाव आज अविनाश साबळे याने चीनमध्ये गाजवले असे म्हटले तर वावगं ठरणार नाही. मराठमोळ्या अविनाश साबळे याने ३००० मीटर स्टीपलचेसमध्ये सुवर्णपदक पटकावले आहे. त्याने ८:१९:५३ मिनिटे पूर्ण केले. या स्पर्धेतील भारताचे हे १२वे सुवर्णपदक आहे. बॅडमिंटनमध्ये भारताची चीनशी स्पर्धा सुरूच आहे. अंतिम सामन्यात दोन्ही संघ २-२ असे बरोबरीत आहेत. शेवटचा सामना जिंकणारा संघच सुवर्ण जिंकेल.

d gukesh
अग्रलेख: महाराष्ट्र ‘दीन’!
Piyush Goyal on Elon Musk Tesla
टेस्लाचा प्रकल्प महाराष्ट्रात की गुजरातमध्ये? पियुष गोयल यांचं ‘मनोज कुमार’ स्टाइल हटके उत्तर
national boxing championship marathi news
नागपूरच्या समीक्षा, अनंतने जिंकले राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक
Wardha Lok Sabha
राष्ट्रवादी २५ वर्षांनंतर पुन्हा वर्ध्याच्या रिंगणात

कोण आहे अविनाश साबळे?

काही वर्षांपूर्वीपर्यंत लांब पल्ल्याच्या धावपटूंच्या नावावर भारताचा कोटा रिक्त होता. पण महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील मांडवा गावात १३ सप्टेंबर १९९४ रोजी जन्मलेल्या अविनाश साबळे याने ती जागा भरून काढली. अविनाश साबळे हे सर्वसामान्य कुटुंबात वाढले. अविनाशचे आई-वडील शेतकरी आहेत आणि अविनाशला त्याच्या शाळेत ६ किलोमीटर चालत जावे लागत होते. अविनाशने खेळात करिअर करण्याचा कधी विचार केला नव्हता पण आज त्याने स्टीपलचेसमध्ये भारतासाठी सुवर्ण पदक जिंकून इतिहास रचला.

साबळेने शनिवारी कॉमनवेल्थ गेम्स २०२२च्या पुरुषांच्या ३००० मीटर स्टीपलचेसच्या अंतिम फेरीत दुसरे स्थान पटकावले आणि रौप्यपदक जिंकले होते. साबळे याची कथा इतर सर्वांपेक्षा वेगळी आहे. स्वत:ला खेळाकडे नेण्याचा विचार त्याने कधीच केला नव्हता. त्याला सैन्यात भरती होऊन आपल्या कुटुंबाचा आधार घ्यायचा होता. अविनाश साबळे १२वी नंतर सैन्यात भरती झाला आणि ५ महार रेजिमेंटचा भाग झाला. त्याच्या सेवेदरम्यान, तो सियाचीनमध्ये उणे अंशात राहिला आणि वाळवंटातही ५० अंश तापमानातही त्याने खूप कष्ट केले.

सैन्यदलात असताना त्याला अ‍ॅथलेटिक्स स्पर्धांमध्ये खेळण्याची संधी मिळाली. त्याने अनिच्छेने क्रॉस कंट्रीसह खेळातील कारकीर्द सुरू केली. मात्र, त्याची प्रतिभा लवकरच सर्वांच्या लक्षात आली. त्यानंतर त्याला दुखापत झाली आणि दुखापतीनंतर त्याचे खूप वजन वाढले. पण साबळे परत आला आणि त्याने १५ किलोपेक्षा जास्त वजन कमी केले आणि पुन्हा धावायला सुरुवात केली आणि आता अविनाशने मनापासून शर्यतीचा सराव सुरू केला. २०१७ मध्ये त्याच्या सैन्य प्रशिक्षकाने त्याला स्टीपलचेसमध्ये धावण्याचा सल्ला दिला. भारताच्या स्टीपलचेझरची सुरुवात अशी झाली.

हेही वाचा: Asian Games, IND vs KOR: भारतीय महिला हॉकी संघाने गाठली उपांत्य फेरी, दक्षिण कोरियाविरुद्ध साधली १-१ अशी बरोबरी

भुवनेश्वर येथे झालेल्या २०१८ ओपन नॅशनलमध्ये, साबळेने ३००० मीटर स्टीपलचेसमध्ये ८:२९.८८ अशी वेळ नोंदवली आणि ३० वर्षांचा राष्ट्रीय विक्रम ०.१२ सेकंदांनी मोडला. पटियाला येथे झालेल्या २०१९ फेडरेशन कपमध्ये साबळेने ८.२८.८९ वेळ नोंदवली आणि नवीन राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला. साबळे याचे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील मोठ्या व्यासपीठावरील हे पहिलेच पदक होते आणि आज आशियाई क्रीडा स्पर्धेत त्याने सुवर्णपदक मिळवत ऐतिहासिक कामगिरी केली. या खेळात उतरून त्याला फारसा वेळ झालेला नाही आणि भविष्यातही तो भारताचा तिरंगा फडकवत राहील, अशी अपेक्षा आहे.