‘ला लिगा’ फुटबॉल स्पध्रेत लेवान्टे संघाशी २-२ अशा बरोबरीनंतरही अ‍ॅटलेटिको माद्रिद संघाने पुढील वर्षीच्या चॅम्पियन्स लीगमध्ये आपले स्थान पक्के केले आहे.
दुसरीकडे सेव्हिल्ला संघाला केल्टा दी व्हिगो संघाने १-१ असे बरोबरीत रोखले. ही लढत बरोबरीत सुटल्यामुळे दोन्ही संघांना एक-एक गुणावर समाधान मानावे लागले आणि अ‍ॅटलेटिकोने ७ गुणांची आघाडी घेत चॅम्पियन्स लीगसाठी पात्रता मिळवली. अ‍ॅटलेटिकोचे आणखी दोन सामने शिल्लक असून ऑगस्टमध्ये होणाऱ्या पात्रताफेरीतून वाचण्यासाठी त्यांना तीन गुणांची आवश्यकता आहे.