Mark Chapman Catch Video: मॉडर्न डे क्रिकेटमध्ये न्युझीलंडचा संघ हा क्षेत्ररक्षणाच्या बाबतीत अव्वल स्थानी असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आधी भारत आणि ऑस्ट्रेलियाचे संघ क्षेत्ररक्षणाच्या बाबतीत पुढे होते. पण आता न्यूझीलंडच्या खेळाडूंनी एकापेक्षा एक भन्नाट कॅच पकडून क्षेत्ररक्षणाचा स्तर उंचावला आहे. भन्नाट कॅच घेण्याच्या बाबतीत ग्लेन फिलिप्स नेहमीच चर्चेत असतो. पण आता ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या सामन्यात मार्क चॅपमनने सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करताना डाईव्ह मारून भन्नाट कॅच घेतला आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

मार्क चॅपमनने ऑस्ट्रेलियाच्या ॲलेक्स कॅरीला बाद करण्यासाठी हा कॅच घेतला. तर झाले असे की, न्यूझीलंडची गोलंदाजी असताना न्यूझीलंडकडून ९ वे षटक टाकण्यासाठी जिमी निशम गोलंदाजीला आला. या षटकातील पाहिल्याच चेंडूवर त्याने टीम डेव्हिडला बाद करत माघारी धाडलं. पहिल्याच चेंडूवर विकेट पडल्याने ऑस्ट्रेलियाचा संघ दबावात होता. त्यामुळे दबाव कमी करण्यासाठी ॲलेक्स कॅरीने पहिल्याच चेंडूवर मोठा फटका मारला. हा चेंडू सीमारेषेपार गेलाच होता, इतक्यात मार्क चॅपमनने डाईव्ह मारली आणि भन्नाट कॅच घेतला.

चेंडू सीमारेषेपार जातोय हे पाहताच मार्क चॅपमनने धाव घेतली आणि डाईव्ह मारून अविश्वसनीय कॅच घेतला. त्यामुळे ॲलेक्स कॅरी पहिल्याच चेंडूवर बाद होऊन माघारी परतला.

या सामन्यात न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी दमदार गोलंदाजी केल. पण शेवटी ऑस्ट्रेलियाने ३ गडी राखून बाजी मारली. या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना न्यूझीलंडने २० षटकात ९ गडी बाद १५६ धावा केल्या होत्या. न्यूझीलंडकडून टीम सिफर्टने ३५ चेंडूत ४८ धावांची खेळी केली. इतर कुठल्याही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही.

या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या ऑस्ट्रेलियाला हवी तशी सुरुवात करता आली नाही. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल मार्शने दमदार शतकी खेळी केली. हा सामना ऑस्ट्रेलियाने २ षटकं शिल्लक ठेवून ८ गडी राखून आपल्या नावावर केला. मिचेल मार्श ५२ चेंडूत १०२ धावा करून नाबाद परतला. हा सामना न्यूझीलंडने गमावला, पण मार्क चॅपमनने घेतलेला झेल तुफान चर्चेत राहिला.