ICC World Cup 2023: भारताविरुद्धच्या पराभवानंतर विश्वचषकात पाकिस्तानसाठी काहीही चांगले घडत नाही. त्यांचे अनेक खेळाडू आजारी पडले आहेत. संघात व्हायरल फिव्हर पसरला आहे. असे म्हटले जात आहे की बहुतेक खेळाडू बरे झाले आहेत, परंतु सहा क्रिकेटपटूंनी सराव सत्रात भाग घेतला नाही. यामध्ये यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवान आणि मुख्य वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी यांचा समावेश आहे. पाकिस्तानचा पुढचा सामना २० ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळायचा आहे.

पाकिस्तानी मीडियानुसार, सराव सत्रापासून दूर राहिलेल्या खेळाडूंमध्ये चार मुख्य संघातील आणि दोन राखीव यादीतील आहेत. मोहम्मद रिझवान, अब्दुल्ला शफीक, शाहीन आफ्रिदी, सलमान अली आगा, जमान खान आणि मोहम्मद हारिस यांनी पर्यायी सराव सत्रात भाग घेतला नाही. त्यापैकी जमान आणि हारिस हे राखीव खेळाडू आहेत. पाकिस्तान संघाने सुरुवातीला सराव न करण्याचा निर्णय घेतला होता, पण नंतर त्यांनी आपली योजना बदलला.

शफीकला ताप आहे

अब्दुल्ला शफीक तापाने त्रस्त आहे. वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी आणि उसामा मीर यांनाही सौम्य तापाची लक्षणे असून, आता दोघेही बरे झाल्याचे सांगण्यात येत आहे. संघाच्या आरोग्य प्रोटोकॉलनुसार तापाची लक्षणे दिसणाऱ्या खेळाडूंची तात्काळ तपासणी करण्यात आली. याशिवाय, सुरक्षा उपायांच्या अनुषंगाने, सर्व खेळाडूंची कोविड-१९ चाचणी आणि डेंग्यू तापाशी संबंधितही लक्षणांची तपासणी करण्यात आली.

हेही वाचा: SA vs NED: दक्षिण आफ्रिकेवरील विजयानंतर नेदरलँडच्या कर्णधाराचे मोठे विधान; म्हणाला, “आम्ही विश्वचषकात सेमीफायनल…”

पाकिस्तानला दोन विजय मिळाले आहेत

या स्पर्धेदरम्यान पाकिस्तानने आतापर्यंत तीन सामन्यांतून दोन विजयांची नोंद केली आहे. त्यांचा एकमेव पराभव कट्टर प्रतिस्पर्धी भारताविरुद्ध झाला आहे. पाकिस्तानला आता ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, दक्षिण आफ्रिका, बांगलादेश, न्यूझीलंड आणि इंग्लंडविरुद्ध खेळायचे आहे. जर पाकिस्तान उपांत्य फेरीसाठी पात्र ठरला तर तो कोलकात्यात खेळेल.

विश्वचषक स्पर्धेतील १४व्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेचा पाच गडी राखून पराभव केला. लखनऊ येथील भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकना स्टेडियमवर सोमवारी (१६ ऑक्टोबर) विजयासह त्याने स्पर्धेत आपले खाते उघडले. या विश्वचषकात ऑस्ट्रेलियाचा हा पहिला विजय आहे. यापूर्वी भारत आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता. श्रीलंकेविरुद्धच्या विजयासह पाचवेळच्या चॅम्पियन संघाचे दोन गुण झाले.

हेही वाचा: World Cup: इंग्लंडच्या प्रशिक्षकांनी बेन स्टोक्सच्या पुनरागमनाबाबत केले सूचक वक्तव्य; म्हणाले, “कदाचित आपल्यातला आत्मविश्वास…”

विश्वचषकासाठी पाकिस्तान संघ

बाबर आझम (कर्णधार), अब्दुल्ला शफीक, फखर जमान, इमाम उल हक, इफ्तिखार अहमद, मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), शादाब खान, मोहम्मद नवाज, उसामा मीर, हारिस रौफ, एम वसीम जूनियर, हसन अली, शाहीन शाह आफ्रिदी, सौद शकील, सलमान अली आगा.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राखीव: मोहम्मद हरिस, अबरार अहमद, जमान खान.