AUS vs PAK Pakistan won the ODI series in Australia after 22 years : नसीम शाह आणि शाहीन आफ्रिदीच्या घातक गोलंदाजीनंतर पाकिस्तानने दमदार फलंदाजीच्या जोरावर तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाचा ८ गडी राखून पराभव केला. . या सामन्यात पाकिस्तान संघाने नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना केवळ १४० धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानने २६.५ षटकांत केवळ २ विकेट्स गमावून सामना जिंकला. या विजयासह पाकिस्तानने २२ वर्षांनी ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच घरी मालिकेत २-१ ने धूळ चारली.

मेलबर्नमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाने २ गडी राखून विजय मिळवला होता, पण त्यानंतर पाकिस्तानने पलटवार करत दोन्ही सामने जिंकून इतिहास रचला. दुसरा एकदिवसीय सामना ॲडलेड ओव्हल येथे खेळला गेला ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाचे फलंदाज पाकिस्तानच्या उत्कृष्ट गोलंदाजीसमोर ढेपाळलेले दिसले. या सामन्यात पाकिस्तानने ९ गडी राखून शानदार विजय नोंदवला होता. आता तिसरा सामना जिंकून पाकिस्तानने ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर मोठा पराक्रम केला आहे.

पाकिस्तान क्रिकेट संघ २२ वर्षांनंतर ऑस्ट्रेलियन भूमीवर एकदिवसीय मालिका जिंकण्यात यशस्वी ठरला. २००२ मध्ये पाकिस्तानने शेवटच्या वेळी हा पराक्रम केला होता. अशा परिस्थितीत चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी हा विजय पाकिस्तानी संघासाठी बळ देणारा ठरणार आहे. याशिवाय मोहम्मद रिझवाननेही आपल्या कर्णधारपदात दमदार सुरुवात केली आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातच रिझवानची पाकिस्तानी संघात नियुक्ती झाली होती. नसीम शाह आणि शाहीन शाह आफ्रिदी यांनी पाकिस्तानविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात अप्रतिम गोलंदाजी केली. या दोघांच्या दमदार गोलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियन संघ अवघ्या १४० धावांवर गारद झाला.

हेही वाचा – Pak vs Aus: भारताविरूद्धची तयारी पडली कांगारुंना भारी; पाकिस्तानने उडवला १४० धावात खुर्दा

u

पाकिस्तानकडून नसीम आणि शाहीनने प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्या. नसीम थोडा महागडा ठरला असला तरी त्याची गोलंदाजी प्रभावी ठरली. नसीम आणि शाहीन व्यतिरिक्त हरिस रौफनेही पाकिस्तानसाठी अप्रतिम गोलंदाजी केली. हरिस रौफने ७ षटकात केवळ २४ धावा देत दोन मोठ्या विकेट्स घेतल्या. यादरम्यान रौफने मालिकेत तिसऱ्यांदा ग्लेन मॅक्सवेलला बाद केले. हरिस रौफने तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत एकूण १० विकेट घेतल्या, ज्यामुळे तो मालिकावीर ठरला.

हेही वाचा – Ind vs Aus: भारताविरुद्ध ऑस्ट्रेलियाने दिली ‘या’ नव्या खेळाडूला संधी; पर्थ कसोटीसाठी केला संघ जाहीर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत पाकिस्तानची गोलंदाजीच नव्हे तर फलंदाजीही उत्कृष्ट राहिली. पाकिस्तानसाठी तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात अब्दुल्ला शफीक आणि सॅम अयुब यांच्यात पहिल्या विकेटसाठी ८४ धावांची भक्कम भागीदारी झाली. पाकिस्तानकडून सॅम अयुबने ५२ चेंडूत ४२ धावांची खेळी केली. याशिवाय शफीकने ५३ चेंडूत ३७ धावा केल्या, तर बाबर आझम २८ धावांवर नाबाद राहिला आणि मोहम्मद रिझवान ३० धावांवर नाबाद राहिला.