बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियन संघ जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत आहे. उभय संघांतील कसोटी मालिकेचा हा दुसरा सामना असून मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर खेळला जात आहे. पहिल्या दिवशी नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. या दौऱ्यात तीन कसोटी आणि दोन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. कसोटी मालिकेने सुरूवात झालेल्या या दौऱ्यात यजमानांनी पहिला सामना जिंकला. विशेष म्हणजे डेव्हिड वॉर्नर एमसीजीवर १००वी कसोटी खेळत आहे. ऑस्ट्रेलियाच्या सक्रिय क्रिकेटपटूंमध्ये सर्वाधिक कसोटी खेळणारा तो दुसरा खेळाडू आहे. मात्र या ऐतिहासिक दिवस असलेल्या सामन्यात फॉक्स स्पोर्ट्सने मोठा घोटाळा केला. त्यामुळे ते सध्या ट्रोल होत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

डेव्हिड वॉर्नर अनुभवी ऑस्ट्रेलियन सलामीवीरासाठी, २६ डिसेंबर हा दिवस त्याच्यासाठी खूप महत्त्वाचा होता. कारण तो जेव्हा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ऑस्ट्रेलियाकडून खेळण्यासाठी मैदानात उतरला तेव्हा तो त्याच्या कारकीर्दीतील १००वी कसोटी खेळत होता. वॉर्नर, जो खेळाच्या सर्वात लांब फॉरमॅटमध्ये आयुष्याच्या चांगल्या-वाईट काळातून जात असताना, जेव्हा तो फलंदाजीसाठी आला तेव्हा त्याचे मोठ्या टाळ्यांनी स्वागत करण्यात आले आणि तसेच उभे राहून चाहत्यांनी, संघातील सहकाऱ्यांनी त्याला मानवंदना दिली. कारण तो आधुनिक काळातील सर्व-स्वरूपातील महान खेळाडूंपैकी एक आहे. मेलबर्न (MCG) स्टेडीयमधील खचाखच भरलेल्या ते गर्दीने दाखूवन दिले.

ऑस्ट्रेलिया सुरु असलेल्या या मालिकेचे प्रसारण हक्क फॉक्स स्पोर्ट्सकडे आहेत. ब्रॉडकास्टर फॉक्स स्पोर्ट्सने वॉर्नरने त्याच्या ३४० सामन्यांच्या कारकिर्दीत ऑस्ट्रेलियासाठी काय केले हे सांगण्यासाठी, कसोटी, एकदिवसीय आणि टी२० या तीनही फॉरमॅटमधील त्याचे धावांचे आकडे दाखवले, जे अतिशय उल्लेखनीय आहेत. वॉर्नरने कसोटीत ७९२२, एकदिवसीय सामन्यात ६००७ आणि टी२० मध्ये २८९४ धावा केल्या आहेत. मात्र, या आकडेवारीला धावा म्हणून दाखवण्याऐवजी, ग्राफिक्सने त्यांना विकेट्स म्हणून दाखवले. एकूण १६८२३ विकेट्स हे कोणत्याही क्रिकेटमधील खेळाडूसाठी अशक्य कधीही न साध्य होणारी गोष्ट आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना ही मोठी चूक लगेच लक्षात आली आणि फॉक्स स्पोर्ट्स यामुळे सोशल मीडियावर ट्रोल झाले. यावर मजेशीर मीम्स तयार होत आहेत.

क्रिकेट चाहत्यांनी केले ट्रोल

एका सोशल मीडियावरील युजरने म्हटले की १६००० विकेट्स घेणे ही जगातील खूप मोठी न पटणारी पण आश्चर्यकारक अशी हास्यास्पद घटना आहे. तो कदाचित जगातील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू आहे पण स्वप्नात देखील अशी करामत करू शकत नाही. तर दुसर्‍याने युजरने विचारले की “रजनीकांत हे करू शकतात का?” अशा अनेक मजेशीर कमेंट्स सोशल मीडियावर येत आहेत.

उभय संघांतील या कसोटी सामन्याविषयी बोलायचे झाले, तर दक्षिण आफ्रिका संघाचा पहिला डाव अवघ्या १८९ धावांवर गुंडाळला गेला. दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियाने देखील एका विकेटच्या नुकसानावर ४५ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू कॅमरून ग्रीनने पहिला दिवस नावावर केला. ग्रीनने पहिल्या डावात टाकलेल्या १०.४ षटकांमध्ये २७ धावा खर्च केल्या आणि सर्वाधिक ५ विकेट्स नावावर केल्या. तसेच मिचेल मार्शने देखील ३९ धावा खर्च करून दोन विकेट्स नावावर केल्या. दक्षिण आफ्रिकेचासटी काइल वेरेन आणि मार्को जॅन्सन यांनी प्रत्येकी अर्धशतकीय योगदान दिले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aus vs sa warners over 16000 wickets fans ask rajinikanth cant even do it in a film video troll of broadcasters mistake avw
First published on: 27-12-2022 at 10:10 IST