AUS vs SA, WTC Final: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ स्पर्धेतील अंतिम सामना गतविजेता ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे. ५ दिवस चालणाऱ्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाला विजयासाठी प्रबळ दावेदार मानलं जात आहे. मात्र, दक्षिण आफ्रिका संघालाही कमी लेखता येणार नाही. ऑस्ट्रेलियाने गेल्या हंगामात भारतीय संघाला पराभूत करून जेतेपदाचा मान मिळवला होता. तर दक्षिण आफ्रिकेने पहिल्यांदाच अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. दरम्यान या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. .

हा सामना ऐतिहासिक लॉर्ड्सच्या मैदानावर सुरू आहे. या मैदानावरील खेळपट्टी ही गोलंदाजांसाठी नेहमीच फायदेशीर ठरते. त्यामुळे फलंदाजांची चांगलीच कसोटी पाहायला मिळेल. या खेळपट्टीवर सुरूवातीला वेगवान गोलंदाजांना मदत मिळेल. त्यानंतर फलंदाजांना धावा करणं सोपं जाईल.

ऑस्ट्रेलियाच्या नेतृत्वाची जबाबदारी पॅट कमिन्सकडे आहे. कमिन्सच्या नेतृत्वाखाली खेळताना ऑस्ट्रेलियाने गेल्या हंगामात जेतेपदाचा मान मिळवला होता. त्यामुळे यावेळी ऑस्ट्रेलियाकडे सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल जिंकण्याची संधी असणार आहे. तर दुसरीकडे दक्षिण आफ्रिका संघाची जबाबदारी टेम्बा बावुमाकडे असणार आहे.

दक्षिण आफ्रिकेने पहिल्यांदाच या स्पर्धेतील फायनलमध्ये प्रवेश केला आहे. या दोन्ही संघांनी फायनलच्या एक दिवसाआधीच आपल्या प्लेइंग ११ ची घोषणा केली होती. दोन्ही संघांनी आपल्या सर्वोत्तम खेळाडूंना प्लेइंग ११ मध्ये स्थान दिलं आहे. त्यामुळे यावेळी ऑस्ट्रेलिया आपलं जेतेपद राखणार, की दक्षिण आफ्रिकेचा संघ पहिल्यांदाच जेतेपदाचा मान मिळवणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

या सामन्यासाठी अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११:

या सामन्यासाठी अशी आहे दक्षिण आफ्रिकेची प्लेइंग ११:

एडन मार्करम, रायन रिकल्टन, वियान मल्डर, टेम्बा बावुमा (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड बेडिंघम, काइल वेरेयने (यष्टीरक्षक), मार्को यान्सेन, केशव महाराज, कागिसो रबाडा, लुंगी एन्गिडी

या सामन्यासाठी अशी आहे ऑस्ट्रेलियाची प्लेइंग ११:

उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, कॅमरन ग्रीन, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅ्व्हिस हेड, ब्यू वेबस्टर, अॅलेक्स कॅरी (यष्टीरक्षक), पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, नाथन लायन, जोश हेजलवूड

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.