Australia Women vs South Africa Women T20 WC Final Match: आयसीसी महिला टी-२० विश्वचषक २०२३ मधील अंतिम सामना आज खेळला जात आहे. ज्यामध्ये यजमान दक्षिण आफ्रिकेचा सामना ऑस्ट्रेलिया संघ आमनेसामने आहेत. हा सामना केपटाऊनच्या न्यूलँड्स मैदानावर खेळवला जात आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाची कर्णधार मेग लॅनिंगने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यात मेग लॅनिंगकडे रिकी पाँटिंगला मागे सोडून इतिहास रचण्याची सुवर्ण संधी आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मेग लॅनिंगने तिच्या नेतृत्वाखाली अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला, तर मेग जगातील सर्वाधिकवेळा आयसीसी ट्रॉफी जिंकणारी कर्णधार बनेल. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाचा महान खेळाडू रिकी पॉन्टिंगला मागे टाकेल. रिकी पाँटिंगने आपल्या नेतृत्वाखाली चार वेळा ऑस्ट्रेलियाला आयसीसी ट्रॉफी जिंकून दिली आहे.

दुसरीकडे, महिला संघात मेग लॅनिंगनेही संघाला चार वेळा आयसीसी चॅम्पियन बनवले आहे, म्हणजेच या दोन्ही कर्णधारांकडे आतापर्यंत ४-४ आयसीसी ट्रॉफी आहेत. अशा परिस्थितीत हा सामना जिंकणे लॅनिंगसाठी स्वप्नापेक्षा कमी नसेल.

सामन्याबद्दल बोलायचे तर ऑस्ट्रेलिया संघाने ११ षटकानंतर १ बाद ७९ धावा केल्या आहेत. अॅलिसा हिली १८ धावांचे योगदान देऊन बाद झाली. तिला मारिझान कॅपने बाद केले. सध्या खेळपट्टीवर बेथ मुनी २७(२८) आणि अॅशले गार्डनर २९ (१८) धावांवर खेळत आहेत.

हेही वाचा – Ishant Sharma: ‘मी जवळपास महिनाभर ढसाढसा रडलो…’, कारकिर्दीतील वाईट काळ आठवून इशांत शर्मा भावूक

दक्षिण आफ्रिका महिला (प्लेइंग इलेव्हन): लॉरा वोल्वार्ड, तझमिन ब्रिट्स, मारिझान कॅप, क्लो ट्रायॉन, नादिन डी क्लर्क, सुने लुस (कर्णधार), अनेके बॉश, सिनालो जाफ्ता (यष्टीरक्षक), शबनीम इस्माईल, अयाबोंगा खाका, नॉनकुलुलेको म्लाबा

ऑस्ट्रेलिया महिला (प्लेइंग इलेव्हन): अॅलिसा हिली (यष्टीरक्षक), बेथ मूनी, मेग लॅनिंग (कर्णधार), अॅशले गार्डनर, ग्रेस हॅरिस, एलिस पेरी, ताहलिया मॅकग्रा, जॉर्जिया वेरेहम, जेस जोनासेन, मेगन शट, डार्सी ब्राउन

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Australia captain meg lanning has a chance to make history by surpassing ricky ponting in ausw vs saw final vbm
First published on: 26-02-2023 at 19:39 IST