AFG vs AUS Highlights in Marathi: लाहोरमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीतील उपांत्य फेरीच्या दृष्टीने अत्यंत सर्वात महत्त्वाचा सामना अफगाणिस्तान वि. ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळवला जात आहे. अ गटातील भारत-न्यूझीलंड उपांत्य फेरीत पोहोचले असून आता ब गटातील कोणते संघ या संघांविरूद्ध भिडणार यावर सर्वांच्या नजरा असणार आहेत. यासाठी अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील हा सामना महत्त्वाचा असणार आहे.

अफगाणिस्तान संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तर ऑस्ट्रेलियाचा संघ प्रथम गोलंदाजी करत होता. ऑस्ट्रेलियाने सामन्यात दणक्यात सुरूवात केली, पण अफगाणिस्तानने हार मानली नाही आणि शेवटपर्यंत उत्कृष्ट फलंदाजी करत २७३ धावांची सन्मानजनक धावसंख्या उभारली.यासह ऑस्ट्रेलियाला विजयासाठी आता २७४ धावांचे लक्ष्य मिळाले आहे.

इब्राहिम झादरान पहिल्याच षटकात स्पेन्सर जॉन्सनच्या चेंडूवर क्लीन बोल्ड झाला. पण त्यानंतर इब्राहिम झादरान आणि सदिकउल्ला अटल यांनी अर्धशतकी भागीदारी रचत संघाच्या धावफलकात धावा जोडल्या. सदिकउल्ला अटलने ९५ चेंडूत ३ षटकार आणि ६ चौकारांच्या मदतीने ८५ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली आणि संघाला १५० धावांचा टप्पा गाठून दिला. यानंतर रहमत शाह १२ धावा, हशमतुल्ला शाहिदी २० दावा करत बाद झाले. तर मागील सामन्याचा शतकवीर इब्राहिम झादरान २२ धावा करत स्वस्तात बाद झाला.

यानंतर संघाचा अष्टपैलू खेळाडू अजमतुल्ला ओमरझाईने वादळी खेळी केली आणि संघाची धावसंख्या २५० पार नेऊन ठेवली. ओमरझाईने ६३ चेंडूत ५ षटकार आणि एका चौकाराच्या मदतीने ६७ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून ड्वारशुईसने ३ विकेट, स्पेन्सर जॉन्सन आणि झाम्पाने २ विकेट्स तर नॅथन एलिस आणि मॅक्सवेल यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.

अफगाणिस्तान-ऑस्ट्रेलिया सामन्याच्या निकालावर ठरणार सेमीफायनलचे संघ

जर ऑस्ट्रेलियन संघाने अफगाणिस्तानला पराभूत केले तर उपांत्य फेरीतील ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेचे स्थान निश्चित होईल. मात्र अफगाणिस्तान संघाने हा सामना जिंकल्यास त्यांचे चार गुण होतील. म्हणजे अफगाणिस्तानचा संघ थेट उपांत्य फेरीत पोहोचेल.

आता जेव्हा दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड यांच्यात सामना होईल, तेव्हा जर दक्षिण आफ्रिकेचा संघ हा सामना जिंकला तर ते थट उपांत्य फेरीत जातील आणि ऑस्ट्रेलिया स्पर्धेतून बाहेर पडेल. पण जर इंग्लंडचा संघ हा सामना जिंकला तर नेट रनरेटच्या आधारे सेमीफायनलमध्ये जाणाऱ्या संघाचा निर्णय होईल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ऑस्ट्रेलियाने जर विजय मिळवला तर ऑस्ट्रेलिया आणि द. आफ्रिका हे संघ उपांत्य फेरीत जातील. तर आफ्रिकेचा संघ नेट रन रेटच्या आधारे उपांत्य फेरीत जाणारा पहिला संघ ठरेल. तर ऑस्ट्रेलिया दुसरा संघ ठरेल. जर अफगाणिस्तानने सामना जिंकता तर तो उपांत्य फेरीत जाणारा ब गटातील पहिला संघ ठरेल. यानंतर भारत-न्यूझीलंड सामन्यातील विजेता संघ अ गटातून सेमीफायनलमध्ये जाणारा पहिला संघ ठरेल. यावरूनच अ गटातील पहिला संघ वि. ब गटातील पहिला संघ असा सामना होईल. तर दुसरा उपांत्य सामनाही तसाच होईल.