Ollie Robinson, Ashes 2023: इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अ‍ॅशेस मालिकेतील पहिला कसोटी सामना एजबॅस्टन येथे खेळला गेला. इंग्लंडने पहिल्या डावात फलंदाजी करताना ३९३ धावांवर डाव घोषित केला होता. त्याच वेळी, ऑस्ट्रेलिया पहिल्या डावात ३८६ धावांवर ऑलआऊट झाला. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियन गोलंदाजांच्या उत्कृष्ट गोलंदाजीमुळे इंग्लंडचा संघ अवघ्या २७३ धावांत आटोपला. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सच्या नाबाद ४४ धावांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला. त्याच्या या खेळीवर आता इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ऑली रॉबिन्सनने उपहासात्मक टीका केली आहे.

सामन्यानंतर इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ऑली रॉबिन्सन म्हणाला की, “प्रतिस्पर्ध्याला कधीही कमी लेखू नये, असे मला वाटते पण, मी तीच चूक केली. एजबॅस्टन कसोटीच्या तिसऱ्या दिवशी पॅट कमिन्सनंतर ऑस्ट्रेलियाचे उर्वरित तीन फलंदाज ११व्या क्रमांकाच्या खेळाडूसारखे होते. पण, कसोटी सामन्याच्या ५व्या दिवशी त्या ३ पैकी २ ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी इंग्लंडच्या विजयाच्या आशा पाणी फेरले. आम्ही त्यांना बाद करण्यात अपयशी ठरलो.”

पुढे कमिन्सबाबत तो म्हणाला की, “नेहमीच ११व्या क्रमांकाचा फलंदाज जिंकवून देईलच असे नाही. आज पॅट कमिन्सचा दिवस होता उद्या आमचा असेल. आम्ही त्यांना जरी कमी लेखले असले तरी ते नेहमीच यशस्वी होतील असे नाही. तळाचे फलंदाज कधीतरी चांगली कामगिरी करून जातात.” असे म्हणत त्याने कमिन्सला डिवचले.

इंग्लंडविरुद्धची एजबॅस्टन कसोटी ऑस्ट्रेलियाने २ विकेट्सने जिंकली. शेवटच्या दिवसाच्या शेवटच्या तासात सामना अतिशय रोमांचक झाला. ऑस्ट्रेलियाची संपूर्ण ताकद त्यांच्या टेलेंडर्सच्या कामगिरीवर अवलंबून होती आणि, त्याने निराश केले नाही. ऑली रॉबिन्सनला चुकीचे सिद्ध करून त्यांनी आपल्या संघाच्या विजयात महत्वपूर्ण योगदान दिले.

हेही वाचा: Ashes 2023: शानदार विजयानंतरही कांगारुंचे नाक कापले; ‘या’ कारणास्तव ICCने ठोठावला ऑस्ट्रेलिया-इंग्लंडला दंड, WTCतही झाले नुकसान

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ऑस्ट्रेलियन टेलेंडर्सनी विजयात मोलाचा वाटा उचलला

ऑस्ट्रेलियन संघाचा टेलेंडर जोश हेझलवूड दुसऱ्या डावात फलंदाजीला आला नाही. मात्र, स्कॉट बोलँड आणि नॅथन लायन यांनी त्यांच्या भूमिका चोख बजावल्या. कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी स्कॉट बोलंड नाईट वॉचमन म्हणून मैदानात उतरला. ऑस्ट्रेलियाने दिलेल्या २८१ धावांचा पाठलाग करताना त्याने २० धावा केल्या. यानंतर कसोटी सामन्याच्या पाचव्या दिवशी पॅट कमिन्ससह नॅथन लियॉनने अर्धशतकी खेळी करून रोमहर्षक विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाच्या विजयात लायनचा नाबाद १४ धावांचा वाटा होता.