Australian Open: एओ (AO) हीट स्ट्रेस स्केल ५ वर पोहोचल्यामुळे मंगळवारी दुपारी ऑस्ट्रेलियन ओपनमधील दुसऱ्या दिवसाचा बाहेरील कोर्टवरील खेळ थांबवण्यात आला. दुपारी २ वाजण्याच्या सुमारास सर्व मैदानी कोर्टवर होणारे सामने थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला. तेव्हा जॉर्डन थॉम्पसन त्याच्या सामन्याच्या पहिल्या फेरीच्या मध्यापर्यंत पोहोचला होता. खेळाडूंना कोर्टातून बाहेर काढले गेले. “असं कधी झालं आहे का? ४५ अंश तापमान असताना देखील मी येथे खेळलो आहे,” असे ऑसी खेळाडूने चेअर अंपायरला सांगत आपली नाराजी व्यक्त केली.

एक अग्रगण्य टेनिस लेखक तुमैनी कॅरायोल यांनी ट्विटरवर माहिती दिली की “मंगळवारी सकाळी टेलर टाऊनसेंड विरुद्ध डियान पॅरीच्या सामन्यादरम्यान कोर्टातून बॉल गर्लला घेऊन जावे लागले”. आर्यना सबालेन्का, गार्बाईन मुगुरुझा, डॉमिनिक थिम, आंद्रे रुबलेव्ह आणि अ‍ॅलिझ कॉर्नेट या खेळाडूंना दिवसाच्या सत्रातील कठीण परिस्थितीचा सामना करावा लागला.

“ऑस्ट्रेलियन ओपनच्या दुसर्‍या दिवशी टाऊनसेंड वि पॅरीच्या सामन्यात अवघी २० मिनिटे शिल्लक असताना अचानक वाढलेल्या तापमानामुळे बॉल गर्ल आजारी पडून कोसली आणि तिला कोर्टबाहेर नेण्यात आले. सर्वजण सुरक्षित रहा,” असे कॅरायोलने ट्विट केले.

टेनिस ऑस्ट्रेलियाने यावर एक निवेदन प्रसारित केले आहे. ते म्हणतात, “समान फेऱ्या होऊन खेळाच्या समाप्तीपर्यंत किंवा टाय-ब्रेक पूर्ण होईपर्यंत सामने सुरू ठेवण्यात आले. कोणतेही नवीन सामने बाहेरील कोर्टात खेळवले जाणार नाहीत. मैदानी सराव कोर्टवरही खेळ थांबवण्यात आला आहे. रॉड लेव्हर अरेना, मार्गारेट कोर्ट एरिना आणि जॉन केन एरिना येथे बंद छताखालील कोर्टवर खेळ सुरू आहे.”

स्पर्धेच्या अति उष्णतेच्या धोरणांतर्गत, मैदानावरील सामने पुन्हा कधी सुरू करता येईल हे निर्धारित करण्यासाठी रेफरी परिस्थिती आणि धोरणाचे सतत पुनरावलोकन करतील. एकदा तो निर्णय झाल्यानंतर, खेळाडूंना खेळ पुन्हा सुरू होण्यापूर्वी किमान ३० मिनिटे आधी सूचना दिली जाईल. सूर्याच्या उष्णतेचे प्रमाण, सावलीतील हवेचे तापमान, सापेक्ष आर्द्रता आणि वाऱ्याचा वेग यावर आधारित कोणत्याही टप्प्यावर खेळ थांबवावा की नाही हे ठरवण्यासाठी टूर्नामेंट आयोजक त्यांच्या स्वत: च्या उष्णतेचा ताण स्केल वापरतात.

हेही वाचा: Australian Open 2023: ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये रशिया-बेलारूसच्या राष्ट्रध्वजांवर बंदी, युक्रेनच्या मागणीची घेतली दखल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, कोर्टवर असलेल्या केवळ तीन सामन्यांपैकी एका सामन्यात, १९ विजेतेपद मिळवणारा माजी जागतिक क्रमवारीत नंबर वन कॅरोलिना प्लिस्कोव्हाने मार्गारेट कोर्ट एरिना येथे चीनच्या वांग शियु हिचा ६-१, ६-३ असा पराभव केला. आयोजकांनी सांगितले की मैदानी कोर्टवरील सामने स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी ५ वाजेपूर्वी पुन्हा सुरू होणार नाहीत. सध्या सुरू असलेल्या सामन्यांसाठी मुख्य शोकोर्ट बंद राहतील.