ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेच्या निमित्ताने नव्या मोसमाच्या सुरुवातीलाच ग्रँड स्लॅम जेतेपदाचा थरार अनुभवायला मिळतो आणि त्याची प्रचिती अगदी पहिल्याच सामन्या दिसून आली. अमेरिकेच्या व्हिनस विल्यम्सला पहिल्याच फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले आहे.
रशियाच्या इकाटेरिया माकारोवा हिने व्हिनस विल्यम्सचा २-६, ६-४, ६-४ असा पराभव स्विकारावा लागला. तब्बल सातवेळा ग्रँड स्लॅम जिंकणाऱया व्हिनसला यावेळी पहिल्याच फेरीत पराभवाचा धक्का बसला आहे. तेही जागतिक क्रमवारीत २२ व्या स्थानी असलेल्या माकारोवाने व्हिनस तगडे आव्हान देत पहिल्याच सामन्यात मात करत पुढील सामन्याचे दार ठोठावले आहे.
तर, दुसऱया बाजूला सेरेना विल्यम्सला ख्रिस इव्हर्ट आणि मार्टिना नवरातिलोव्हा यांच्या १८ ग्रँड स्लॅम जेतेपदांशी बरोबरी साधण्याची संधी मिळणार आहे. सध्या तुफान फॉर्मात असलेल्या सेरेनासमोर गतविजेती व्हिक्टोरिया अझारेंका, मारिया शारापोव्हा आणि गतउपविजेती ली ना यांचे आव्हान असणार आहे.