PM Anthony Albanese praises Australian team: ॲशेस मालिकेतील दुसरा कसोटी सामना इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघांत रविवारी पार पडला. लॉर्डसवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा ४३ धावांनी पराभव केला. ऑस्ट्रेलियाच्या या विजयापेक्षा त्यांच्या खिलाडूवृत्तीचीच चर्चा जास्त होत आहे. ऑस्ट्रेलियन संघाला सतत मीडियाच्या टीकेला सामोरे जावे लागत आहे आणि आता इंग्लंडच्या अनेक माजी खेळाडूंसह दोन्ही देशांचे पंतप्रधानही आमनेसामने आले आहेत. कारण ब्रिटनच्या पंतप्रधानांनंतर आता ऑस्ट्रलियाच्या पंतप्रधानांनी प्रतिक्रिया दिली आहे.

इंग्लंडचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी लॉर्ड्स कसोटी सामन्यानंतर विधान केले होते की, ते इंग्लंड संघाचा कर्णधार बेन स्टोक्सच्या विधानाचे पूर्ण समर्थन करतात, ज्यात त्यांनी ऑस्ट्रेलियन संघाच्या खेळावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. यावर ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी मीडियाशी बोलताना सांगितले की, मला आपल्या खेळाडूंचा अभिमान आहे. पुरुष आणि महिलांनी त्यांचे पहिले दोन्ही ॲशेस कसोटी सामने जिंकण्यात यश मिळविले. ही एक अद्भुत गोष्ट आहे.

आम्ही संघाचे स्वागत करण्यास उत्सुक –

अँथनी अल्बानीजने प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, “आम्हली आमच्या खेळाडूंचा अभिमान आहे. महिला आणि पुरुष संघ त्यांच्या सुरुवातीच्या ॲशेस कसोटी सामने जिंकू शकले आहेत. हे आश्चर्यकारक आहे.” आपला मुद्दा पुढे नेत, ऑस्ट्रेलियन पंतप्रधान म्हणाले, “तोच जुना ऑस्ट्रेलियन संघ आहे, जो नेहमी जिंकतो! मी त्यांचे मायदेशात विजयी स्वागत करण्यास उत्सुक आहे.”

हेही वाचा – ENG vs AUS: ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी ऑस्ट्रेलियाच्या खेळ भावनेवर दिली प्रतिक्रिया; म्हणाले, “जॉनी बेअरस्टोची विकेट…”

२०२३ मधील ॲशेस मालिकेतील तिसरा कसोटी सामना ६ जुलैपासून हेडिंग्ले येथे खेळवला जाणार आहे. जर ऑस्ट्रेलियन संघ हा सामना जिंकण्यात यशस्वी ठरला, तर तो ॲशेस मालिकेत विजयी आघाडी घेईल. त्याचबरोबर जर तिसरा सामना अनिर्णीत राहिला, तर ऑस्ट्रेलियन संघ मालिकेत कायम राहिल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जॉनी बेअरस्टोचे काय आहे प्रकरण?

खरं तर, इंग्लंडच्या डावातील ५२ व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर जॉनी बेअरस्टोने कॅमेरून ग्रीनचा शॉर्ट बॉल मागे सोडला होता. यानंतर, बेअरस्टो लगेच क्रीझच्या बाहेर गेला, जेव्हा चेंडू डेड झाला झाला नव्हता आणि यष्टिरक्षक ॲलेक्स कॅरीने तो आपल्या ग्लोव्हजमध्ये पकडला आणि स्टंपच्या दिशेने परत फेकला, ज्यामुळे बेल्स विखुरल्या आणि ऑस्ट्रेलिया संघाने आऊटची अपील केली. यानंतर थर्ड अंपायरने जॉनीला आऊट घोषित केले.