पहिल्या दिवशी डेव्हिड वॉर्नरने केलेल्या कामगिरीचा कित्ता गिरवत युवा फलंदाज मार्नस लबूशेननेही (१८५) झळकावलेल्या कारकीर्दीतील पहिल्या दीडशतकाच्या बळावर ऑस्ट्रेलियाने पहिल्या कसोटी सामन्यात पाकिस्तानपुढे विजयासाठी ३४० धावांचे लक्ष्य ठेवले. परंतु मिचेल स्टार्कच्या भेदक माऱ्यापुढे तिसऱ्या दिवसअखेर पाकिस्तानची ३ बाद ६४ धावा अशी अवस्था झाली आहे.

तिसऱ्या दिवसाच्या सुरुवातीला वॉर्नर (१५४) लवकर बाद झाला. मग भरवशाचा स्टीव्ह स्मिथही (४) अपयशी ठरला. मॅथ्यू वेडसह (६०) चौथ्या गडय़ासाठी ११० धावांची भागीदारी रचतानाच लबूशेनने शतकी टप्पा ओलांडला. २० चौकारांसह १८५ धावा काढून दिवसाच्या अखेरच्या सत्रात लबूशेन बाद झाल्यामुळे ऑस्ट्रेलियाचा डाव ५८० धावांवर संपुष्टात आला.

दुसऱ्या डावात २५ धावांतच तीन फलंदाजांना गमावणाऱ्या पाकिस्तानच्या आशा चौथ्या गडय़ासाठी ३९ धावांची भर घालणाऱ्या शान मसूद (२७*) आणि बाबर आझम (२०*) यांच्यावर टिकून आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संक्षिप्त धावफलक

पाकिस्तान (पहिला डाव) : सर्व बाद २४०

ऑस्ट्रेलिया (पहिला डाव) : १५७.४ षटकांत सर्व बाद ५८० (मार्नस लबूशेन १८५, डेव्हिड वॉर्नर १५४; यासिर शाह ४/२०५)

पाकिस्तान (दुसरा डाव) : १७ षटकांत ३ बाद ६४ (शान मसूद खेळत आहे २७, बाबर आझम खेळत आहे २०; मिचेल स्टार्क २/२५).