England vs Australia 1st Test Ashes Series 2023 Updates: इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अॅशेस २०२३ मालिकेची सुरुवात खूपच रोमांचक झाली आहे. एजबॅस्टन येथे झालेल्या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने दोन विकेट्सने विजय मिळवला. या सामन्यात इंग्लंडने ऑस्ट्रेलियाला २८१ धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने ८ विकेट्स गमावून २८२ धावा केल्या. या दरम्यान पॅट कमिन्ससह नॅथन लायनने ९व्या विकेटसाठी ५५ धावांची मॅच-विनिंग भागीदारी केली.

पॅट कमिन्सने ४४ तर लायनने १६ धावांची नाबाद खेळी केली. या सामन्यात अनेक मोठे विक्रमही मोडीत निघाले. ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्स देखील बॉल आणि बॅटने चांगली कामगिरी केल्यानंतर एका खास क्लबचा भाग बनला आहे.

१.पाहुण्या संघाविरुद्ध पाचव्या सर्वोच्च लक्ष्याचा पाठलाग –

ऑस्ट्रेलिया संघाने त्यांच्या घरच्या मैदानावर इंग्लंडविरुद्ध कसोटी स्वरूपातील पाचव्या सर्वोच्च लक्ष्याचा पाठलाग केला आहे. कांगारू संघही या बाबतीत पहिल्या क्रमांकावर आहे. ज्याने १९४८ साली हेडिंग्ले कसोटीत ४०४ धावांचा पाठलाग केला होता. २००८ साली एजबॅस्टन येथे दक्षिण आफ्रिकेच्या संघाने इंग्लंडविरुद्ध २८१ धावांचा यशस्वी पाठलाग केला.

हेही वाचा – ZIM vs NED: सिकंदर रझाने झिम्बाब्वेसाठी रचला इतिहास, दोनच दिवसांत मोडला ‘हा’ मोठा विक्रम

२. ही कामगिरी करणारा कमिन्स ऑस्ट्रेलियाचा सहावा कर्णधार ठरला –

ऑस्ट्रेलियन कर्णधार या नात्याने पॅट कमिन्सने या कसोटी सामन्यात चेंडू आणि बॅट या दोन्ही बाबतीत चांगली कामगिरी केली. या सामन्यात कमिन्सने ८० धावा करण्यासोबतच एकूण ४ विकेट्सही घेतल्या. अशी कामगिरी करणारा कमिन्स हा ऑस्ट्रेलियाचा सहावा कर्णधार ठरला आहे. याआधी बॉब सिम्पसनने ४ वेळा, जॉर्ज गिफेनने २ वेळा, वॉर्विक आर्मस्ट्राँग, रिची बेनॉड आणि अॅलन बॉर्डरने ४ वेळा अशी कामगिरी केली आहे.

३. धावांचा यशस्वी पाठलाग करताना 9व्या विकेटसाठी चौथी सर्वोच्च भागीदारी –

पॅट कमिन्स आणि नॅथन लायन यांच्यातील या कसोटी सामन्यात ९व्या विकेटसाठी ५५ धावांची भागीदारीने एका खास विक्रमात स्थान मिळवले आहे. कमिन्स आणि लायनची ही भागीदारी कसोटी क्रिकेटमध्ये 9व्या विकेटसाठी धावांचा यशस्वी पाठलाग करताना चौथी सर्वोच्च भागीदारी आहे. या यादीत पहिल्या क्रमांकावर व्हीव्हीएस लक्ष्मण आणि इशांत शर्मा यांच्यात २०१० मध्ये झालेली ८१ धावांची भागीदारी आहे. हे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मोहाली कसोटी सामन्यात पाहायला मिळाले.

हेही वाचा – Ashes Series 2023: “मला कसलंही दु:ख नाही, मी एक…”, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर बेन स्टोक्सची प्रतिक्रिया

४. ऑस्ट्रेलियन कर्णधार म्हणून कसोटीत सर्वाधिक षटकार मारणार दुसरा खेळाडू –

एजबॅस्टन कसोटी सामन्यात पॅट कमिन्सच्या बॅटमधून एकूण ५ षटकार निघाले. यासह, तो आता एका कसोटीत कांगारूंचा कर्णधार म्हणून सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत रिकी पाँटिंगनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. पाँटिंगने २००५ साली न्यूझीलंडविरुद्ध ६ षटकार ठोकले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

५. अॅशेसमध्ये ऑस्ट्रेलियाचा चौथ्या क्रमांकाचा यशस्वी धावांचा पाठलाग –

अॅशेसच्या इतिहासात, ऑस्ट्रेलियन संघ त्यांच्या चौथ्या मोठ्या यशस्वी धावांचा पाठलाग करण्यात यशस्वी झाला. या यादीत पहिला क्रमांक १९४८ च्या हेडिंग्ले कसोटीचा आहे, ज्यात कांगारू संघाने ४०४ धावांचा पाठलाग केला होता. त्याचवेळी, १९०१-०२ मध्ये ऑस्ट्रेलियाने अॅडलेड कसोटीत ३१५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग केला होता, तर १९२८-२९ मध्ये मेलबर्न कसोटीत २८६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग केला होता.